आ. संग्राम जगताप यांच्यामुळे बोल्हेगाव परिसराला आता शहराचा लुक

अहमदनगर : शहराचे विस्तारीकरण व्हावे, यासाठी शहराला जोडणारे रस्ते, विकसित करण्यासाठी राज्य शासनाकडुन मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. बोल्हेगाव, नागापुर हा परिसर पुर्वी ग्रामपंचायतमध्ये होता. तो नव्याने महापालिकेत समाविष्ट झालेला आहे. या भागाच्या विकासाला मुलभूत प्रश्नांपासुन सुरूवात केलेली असून नगरसेवक कुमार वाकळे यांच्या पाठपुराव्यामुळे हा परिसर वेगाने विकसित होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातुन या पुढील … Read more

कोरोना बाबत ‘फेक न्यूज’ दिल्याबद्दल संशयित महिलेसह दोघांना अटक

वृत्तसंस्था :- हंगेरी देशात कोरोना विषाणूमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे खोटे वृत्त प्रकाशित करणाऱ्या एका संकेतस्थळाचा भंडाफोड केल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली. हंगेरीत अद्यापपर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खोट्या बातम्या देणाऱ्या एका संकेतस्थळाने अनेक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा दावा केला होता. काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त या संकेतस्थळावर देण्यात आले … Read more

कोरोना व्हायरसच्या प्रसारासाठी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जबाबदार !

मॉस्को : कोरोना व्हायरसचा उगम चीनच्या हुबेई प्रांतात झाल्याचे शास्त्रज्ञांनी सप्रमाण सिद्ध केले आहे; पण रशियन माध्यमांनी या प्राणघातक विषाणूमागे पाश्चिमात्य राष्ट्रांचा विशेषत: अमेरिकेचा हात असल्याचा अजब दावा करून खळबळ उडवून दिली आहे. रशियाचे ‘चॅनल वन’ आपल्या ‘रेम्या’ (टाइम) नामक प्राइम टाइम कार्यक्रमात ‘कोरोना’वर चर्चा करत आहे. त्यात कोरोनाच्या प्रसारामागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला … Read more

ट्रकने धडक दिल्याने मेंढपाळाचा मृत्यू

आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द शिवारात ट्रकने हजारवाडी येथील सायकलस्वार बाळू संभाजी हजारे (वय ५०) यांना जोराची धडक दिल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाला. शनिवारी (दि. ८) दुपारी ही घटना घडली. याबाबत मयताचे बंधू चिमाजी हजारे यांनी आश्वी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माळेवाडी शिवारातील प्रवरा उजव्या कालव्यालगत असलेल्या चारी क्र. ७ … Read more

नगर- मनमाड रोडवर ट्रक लुटला

कोपरगाव :- नगर- मनमाड रोडवर कोपरगावपासून चार कि.मी. अंतरावर टाकळी फाट्यानजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास उभ्या आयशरची काच फोडून आत प्रवेश करून मध्यप्रदेशमधील खाचरोद येथील गाडीचे क्लीनर लाखनसिंग जगदीश परमार (वय २८) यांना धाक दाखवून त्यांच्याकडील ३३ हजार रुपयांच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेश येथील खाचरोद (ता. बदनावर, जि. धार) येथील … Read more

आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई:- हिंगणघाट जळीता हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलीआहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.त्याला कठोरातील कठोऱ शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली … Read more

शिर्डी शहरातून मायलेक बेपत्ता

साकुरी : शिर्डी शहरातील काटकर वस्तीवरील अर्चना लक्ष्मण काटकर (वय ३६) व मुलगा सागर लक्ष्मण काटकर (वय १५) मायलेक दि. २९ जानेवारी रोजी सकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरातून निघून गेले. शोधाशोध करूनही तपास लागत नसल्याने राहाता तालुक्यातील लोहगाव येथील सोनाली अमोल वढांगळे यांनी शिर्डी पोलिसांत मिसिंगची तक्रार दिली आहे. त्या आधारे शिर्डी पोलिासांनी मिसिंग … Read more

विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी तरुणाला अटक

जळगाव : शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करून तिची छेड काढल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपासचक्रे फिरवून पोलिसांनी रात्री ऋषीकेश सोनवणे (१८) रा. वाल्मिकनगर याला ताब्यात घेतले. रविवारी त्याला कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. इयत्ता आठवीच्या वर्गातील मुलीचा पाठलाग करून तरूण शाळेच्या गेटजवळ थांबत असायचा. छेडछाडीच्या जाचाला … Read more

मादी व दोन बछड्यांची होईना भेट,एका बछड्याचा मृत्यू …

आश्वी : तीन दिवस उलटूनही मादी बिबट्या व तिच्या दोन बछड्यांची भेट होत नसल्यामुळे या मायलेकरांच्या भेटीकडे वनविभागासह तालुक्यातील प्राणीप्रेमी नागरिकांचे लक्ष लागले होते. परंतु, रविवारी उपासमार होत असल्याने एका बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. संगमनेर तालुक्यातील माळेवाडी शिवारातील आश्वी-शेडगाव रस्त्यालगत माजी सरपंच भाऊसाहेब संभाजी मांढरे यांच्या गट नं. २६८ मध्ये ऊसतोडणी सुरू असताना … Read more

दारू पिल्यानंतर पाच रुपये कमी दिल्याने झाले वाद, युवकाचे दोन्ही पाय फ्रॅक्चर !

नागपूर : पन्नास रुपयांची दारू पिल्यानंतर केवळ ४५ रुपये दिले म्हणून एका दारूविक्रेत्याने युवकाचे लाकडी फळीने मारून दोन्ही पाय फ्रॅक्चर केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी इमामवाडा पोलिसांनी दारूविक्रे त्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राहुल बबन काळे (२६, रा. इमामवाडा, नागपूर) असे जखमी युवकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, राहुल काळे याला … Read more

‘व्हॅलेन्टाईन डे’मुळे गुलाब झाला महाग !

व्हॅलेन्टाईन डे’ अवघ्या काही दिवसांवर आला असून यामुळे लाल गुलाबांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. त्यामुळे त्या फुलांच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात फुलांच्या २० नगास १६० ते १८० रुपये भाव मिळत आहे. येत्या शुक्रवारी (दि. १४) व्हॅलेन्टाईन डे आहे. या दिवशी प्रेमाच्या आणाभाका घेत गुलाबाचे फूल देण्याची प्रथा … Read more

राहत्या घरी गळफास घेऊन पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

अलिबाग : अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप माने यांनी रविवारी आपल्या महाड येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महाड पोलीस याबाबत तपास करत आहेत. जिल्हा पोलीस दलातील पोलिसांच्या आत्महत्येबाबतची ही चौथी घटना आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रायगड पोलीस दल चर्चेत आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक … Read more

ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांना पुन्हा अटक

श्रीनगर : जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना रविवारी पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले आहे. काश्मीर खोऱ्यात अलिप्ततावाद्यांचे समर्थन केल्याबद्दल लोक सुरक्षा कायद्यानुसार (पीएसए) त्यांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. देशविरोधी वक्तव्ये करणे तथा प्रतिबंधित ‘जमात-ए-इस्लामी’च्या कारवायांना समर्थन दिल्याचा आरोप पीडीपीच्या ६० वर्षीय नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यावर आहे. त्यांच्या भूमिकेमुळे काश्मीर खोऱ्यातील स्थिती … Read more

या कारणामुळे काश्मीरमध्ये पुन्हा इंटरनेट बंद

श्रीनगर : संसदेवर हल्ला करणारा दहशतवादी मोहम्मद अफझल गुरूला फाशी देण्याच्या घटनेला सात वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काश्मीर खोऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रविवारी मोबाईल इंटरनेट सेवा स्थगित करण्यात आली आहे. अफझल गुरूच्या फाशीविरोधात काही अलिप्ततावादी संघटनांनी बंदचे आवाहन केले होते. त्यामुळे हिंसाचार घडण्याची शक्यता होती. ५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० रद्द केल्यापासून … Read more

पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त, पहा आजचे दर …

‘करोना व्हायरस’च्या प्रकोपाने चीनमधील कमी झालेली मागणी आणि जागतिक कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतींमधील घसरणीच्या पार्श्वभूमीवर सलग पाचव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. नवी दिल्ली : रविवारी पेट्रोल व डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे २२ व २० पैशांनी कमी झाले. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोल ७२.२३ रुपये व डिझेल ६५.४३ रुपये या दरावर … Read more

..असे झाले त्या पाच कुख्यात आरोपींचे ‘पलायन’

कर्जत : कर्जतच्या जुन्या पोलिस ठाण्याच्या इमारतीतील उपकारागृहात असलेल्या एका बराकितील सहा आरोपींपैकी खून आणि बलात्कार प्रकारणातील पाच आरोपींनी कारागृहाचे छत उचकटुन पलायन केले. ही घटना रविवारी सायंकाळी सात ते साडे सातच्या सुमारास घडली. ज्ञानदेव तुकाराम कोल्हे (रा.नान्नज जवळा, ता.जामखेड), अक्षय रामदास राऊत (पारेवाडी, अरणगाव ता.जामखेड), मोहन कुंडलिक (भोरे रा.कवडगाव ता.जामखेड), चंद्रकांत महादेव राऊत (रा.पारेवाडी, … Read more

काेराेना विषाणूचा भस्मासुर …आतापर्यंत झाले इतके मृत्यू !

काेराेना विषाणूचा भस्मासुर वाढत चालल्याचे रविवारी दिसून आले. चीनमध्ये विषाणूमुळे मृतांची संख्या रविवारी ८११ वर पाेहाेचली. २००२-२००३ मध्ये सार्समुळे माेठ्या संख्येने लाेक दगावले हाेते. त्यापेक्षा जास्त संसर्ग हाेत असलेल्या काेराेनाची बाधा आता ३७ हजार लाेकांना झाली आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनकडून दरराेज काेराेनाविषयीची माहिती जाहीर केली जाते. रविवारी जाहीर केलेल्या माहितीनुसार चीनमधील ३१ प्रांतांत ३७ … Read more

अट्टल गुन्हेगारांकडून पिस्तुलासह सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

  शिर्डी :- परिसरात गुन्हे करणाऱ्या दोघांना पोलिसांना गजाआड करण्यात यश मिळाले. या वेळी चौघे जण फरार होण्यात यशस्वी झाले. अटक करण्यात आलेल्या दोघांकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, चाकू, दोरी, मिरची पूड, मोटारसायकल असा सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहाता न्यायालयाने दोघांना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. फरार आरोपींचा कसून शोध घेतला जात … Read more