Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांचे स्वागत असे काही केले की गुन्हाच दाखल झाला, मिरवणुकीची राज्यात चर्चा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Dhananjay Munde : दोन दिवसांपूर्वी डीजे, विद्युतरोषणाई आणि 50 जेसीबीमधून फुलांची उधळण करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांचे परळीत स्वागत करण्यात आले. धनंजय मुंडे हे अपघातातून बरे होऊन महिनाभरानंतर आज परळी या आपल्या मतदारसंघात परतले. त्यामुळे परळीत समर्थकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

या मिरवणुकीची राज्यात चर्चा झाली आहे. असे असले तरी आता ही मिरवणूक आयोजकांच्या अंगलट आली आहे. या कार्यक्रमाला पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत परवनागी दिली होती. पण मुंडे यांची मिरवणूक व भाषण रात्री बारानंतरही सुरू होते. यामुळे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

कार्यक्रमाचे आयोजक आणि मुंडे यांचे कट्टर समर्थक वाल्मिक कराड यांच्या विरोधात परळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कार्यक्रमाला पोलिसांनी रात्री १० वाजेपर्यंत परवनागी दिली होती. पण मुंडे यांची मिरवणूक व भाषण रात्री बारानंतरही सुरू होते.

दरम्यान, रोडवर कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. क्रेनवर एक भला मोठा हार लावण्यात आला होता. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तब्बल 50 जेसीबी उभे करून त्यातून मुंडेंवर फुलांची उधळण करण्यात आली. रात्री 10 वाजता मुंडे कार्यक्रमस्थळी आले, तेव्हा डीजेच्या तालावर समर्थक नाचत होते.

दरम्यान, ते मुंबईमधून परळीत दाखल झाले. परळी शहरात मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात झालेल्या दुखापतीतून बरे होवून आज पहिल्यांदाच ते परळीत दाखल झाले. त्यांनी गहिनीनाथ गडावर जाऊन दर्शन घेतले.

तसेच परळीत दाखल होताच त्यांनी आपले वडिल स्व. पंडितअण्णा मुंडे यांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. 4 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांचा अपघात झाला होता. वाहनचालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये मुंडे यांच्या छातीला मार लागला होता.