डॉ. सुजय विखे यांच्या संवाद सभांना वाढती गर्दी विरोधकांसाठी डोकेदुखी : विक्रमसिंह कळमकर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : जस जसी निवडणुकीची घटका जवळ येत आहे, तस तशी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभांना गर्दी वाढच चालली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना गर्दी नसल्याने आपल्या सभा रद्द कराव्या लागत असल्याचे चित्र अहिल्यानगर दक्षिण मतदार संघात दिसत आहे. यामुळे जनतेने निवडणुकी आधीच निकाल दिला अशी भिती विरोधकांना वाटत असल्याने खालच्या पातळीच्या टीका टिपण्या करत डॉ. विखेंच्या विरोधात आगपाखड करत असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका तालुकाअध्यक्ष विक्रमसिंह कळमकर यांनी व्यक्त केले.

साधी राहणी आणि साधी बोली यामुळे सुजय विखे हे मतदारांच्या पसंतीत उतरत असून त्यांच्या प्रचार सभा प्रचंड गर्दीत पार पडत आहेत. असेही विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.पक्षाकडून घोषणा झालेल्या उमेदवारांनी आपल्या प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यात अहिल्यानगर मध्ये महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार सुजय विखे पाटील हे भाजपाच्या वतीने पुन्हा मैदानात आहेत. तर तळ्यात मळ्यात करत आधी अजितदादा पवार यांच्या गोट्यात असेलेले विद्यमान पारनेरचे आमदार निलेश लंके उमेदवारीच्या लालसेने तुतारी फुंकत शरद पवारांच्या चरणी लीन झाले. आणि उमेदवारी आपल्या पदरात पाडून घेतली.

दुसरीकडे सुजय विखे यांनी आपल्या कामाच्या जोरावर उमेदवारी आपल्यालाच मिळणार असा सिक्सर लगावत मतदारसंघात आपल्या गाठी भेटी वाढविल्या. परिणामी त्यांची उमेदवारी जाहीर होताच लोकांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला.अहिल्यानगरचे राजकारण समिश्र असल्याने महायुतीच्या घटक पक्षांचा डॉ. सुजय विखे पाटील मोठा फायदा होत आहे. घटक पक्षानी सुद्धा सुजय विखे यांच्या प्रचारांची धुरा सांभाळल्याने सुजय विखे पाटील यांचे पारडे जर झाले.

त्यांच्या प्रचार सभा, क्रॉनर मिटिंग, बुथ कमीटी बैठक, प्रचार सभा, गावोगावी दौरे यामुळे त्यांचा जनसंपर्क वाढत गेला. यामुळे आता दक्षिण मतदारसंघात डॉ.सुजय विखे यांची चांगलीच हवा निर्माण झाली आहे. त्यांनी विरोधकांवर टीका न करता आपल्या कामांचा आणि देशाचे नेतृत्व असेलेल्या मोदींचा प्रचार सुरू केला. आधीच मोदींच्या लाटेत असलेला देश आणि विखेंची कामे यामुळे सामान्य नागरिक त्यांच्याकडे आकर्षिला जात आहे. सुजय विखे यांच्या प्रचार सभांना आवर्जून लोक हजेरी लावत असल्याचे विक्रमसिंह कळमकर यांनी सांगितले.

विक्रमसिंह कळमकर यांनी माहिती देताना सांगितले की, सध्या तरुणांमध्ये सुजय दादांचे भलतेच क्रेज आहे. यामुळे जिथे जिथे सभा, कार्यक्रम, बैठका होतात त्या ठिकाणी तरुणांचा गराडा सुजय दादांच्या भोवती पहायला मिळत आहे. त्यांच्या बरोबर सेल्फी, फोटो काढत तरूण आपल्या सोशल मिडिया अकाऊंडवर प्रकाशित करत आहेत.

याचा सुजय विखे यांना मोठा फायदा होत आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या सभेला बडे नेते येऊनही सभेला माणसं मिळत नसल्याने विरोधकांची नाच्चकी होत आहे. यामुळे धमक्या, शिवराळ भाषेचा वापर करत सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम विरोधी उमेदवार करत आहेत. अहिल्यानगरचा निकाल लागला असून फक्त किती मोठ्या मताधिक्याने सुजय विखे निवडून येतात याची आम्ही वाट पाहत असल्याचे विक्रमसिंह कळमकर म्हणाले.