Eknath Shinde : पायऱ्यांवरून मुख्यमंत्री पडता पडता वाचले, संकटमोचक गिरीश महाजनांना आले मदतीला..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eknath Shinde : कालपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिंदे-फडणवीस सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. यामध्ये विरोधक आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे. असे असताना पहिल्याच दिवशी एक घटना घडली आहे.

काल विधानभवनातून बाहेर येत असताना पायऱ्यावरून उतरताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तोल गेला. मात्र, त्यांच्या बरोबर चालणारे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना हात देत सावरले. यामुळे मुख्यमंत्र्यांचा तोल जाता जाता राहिला.

त्यामुळे गिरीश महाजन हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीही संकट मोचक ठरले. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वताला सावरत ते पुढे निघून गेले.

दरम्यान, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. 9 मार्चला अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या बाजारभाव नसल्याने शेतकरी अडचणीत आला आहे.

दरम्यान, काल सभागृहात मोठा गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस आणि भास्कर जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे आता आज देखील सभागृहात काय-काय घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिंदे यांना शिवसेना नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर पहिलेच अधिवेशन हे होत आहे.