Maharashtra Guardian Minister List : तुम्हाला माहिती आहे का महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत ? वाचा सध्या तुमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्रमध्ये प्रशासन किंवा राजकीय दृष्टिकोनातून विचार केला तर कामाच्या सोयीसाठी अनेक पदांची विभागणी करण्यात आलेली असते. प्रशासनाच्या दृष्टिकोनातून किंवा राजकीय दृष्टिकोनातून अशा विभागणीला खूप महत्त्व असते व विकास कामांचा आराखडा व इतर महत्त्वाच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून ही विभागणी खूप फायद्याची ठरते.

प्रशासनाच्या कामाच्या सोयीच्या दृष्टिकोनातून जसे विभाग करण्यात आलेले आहेत तसेच जिल्ह्यानुसार देखील अनेक पदांची निर्मिती करण्यात आलेली आहे. म्हणजेच यामुळे प्रशासकीय कामे करणे सोपे जाते. याच अनुषंगाने राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर जे काही मंत्री असतात त्यांना देखील जिल्ह्यानुसार काही जबाबदाऱ्या सोपवल्या जात असतात व यामध्ये पालकमंत्री पद हे खूप महत्त्वाचे असते.

प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांचे नियुक्ती ही मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येते व या पदासाठी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नियुक्ती केली जाते. जर आपण पालकमंत्र्यांचे काम पाहिले तर जिल्हास्तरावरील प्रशासन आणि राज्य सरकार यांच्यामधील एक महत्त्वाचा दुवा म्हणून पालकमंत्री काम करत असतात.

जर आपण पालकमंत्र्याचे काम पाहिले तर जिल्हा प्रशासनाला वेळोवेळी बऱ्याच गोष्टींनी मार्गदर्शन करण्याचे व राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या काही योजना असतात त्या प्रशासनाच्या माध्यमातून व्यवस्थित नियोजन करून त्यांचे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पालकमंत्र्यांची असते.

या दृष्टिकोनातून ते जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष देखील असतात. जिल्ह्याचे जे काही प्रश्न असतील ते राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिरीरीने मांडून ते सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील असतात. एकंदरीत जिल्ह्याच्या विकासाचे जबाबदारी पालकमंत्र्यांवर असते.

त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी पालकमंत्री नियुक्त केले जातात. अनुषंगाने जर आपण 2023 मधील महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी या लेखात बघणार आहोत.

 महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री कोण आहेत?

1- अहमदनगर आणि अकोला या दोन्ही जिल्ह्यांचे सध्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत.

2- अमरावती जिल्हा अमरावतीचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे आहेत.

3- बीड जिल्हा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री सध्या धनंजय मुंडे आहेत.

4- भंडारा जिल्हा भंडारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री हे विजयकुमार गावित हे आहेत.

5- छत्रपती संभाजी नगर जिल्हा छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे आहेत.

6- बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत.

7- चंद्रपूर जिल्हा चंद्रपूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.

8- धुळे जिल्हा धुळे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत.

9- धाराशिव जिल्हा नाशिक जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत आहेत.

10- गडचिरोली जिल्हा गडचिरोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

11- गोंदिया जिल्हा गोंदिया जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम आहेत.

12- जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहेत.

13- जालना जिल्हा जालना जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री अतुल सावे आहेत.

14- हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आहेत.

15- कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आहेत.

16- लातूर जिल्हा लातूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत.

17- मुंबई शहर मुंबई शहरचे सध्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आहेत.

18- मुंबई उपनगर मुंबई उपनगरचे सध्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आहेत.

19- नागपूर जिल्हा नागपूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत.

20- नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आहेत.

21- नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री दादा भुसे आहेत.

22- नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री अनिल पाटील आहेत.

23- पालघर जिल्हा पालघर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत.

24- परभणी जिल्हा परभणी जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री संजय बनसोडे आहेत.

25- पुणे जिल्हा पुणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री अजित पवार आहेत.

26- रायगड रत्नागिरी जिल्हा रायगड व रत्नागिरी जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री उदय सामंत आहेत.

27- सांगली जिल्हा सांगली जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री सुरेश खाडे हे आहेत.

28- सातारा जिल्हा सातारा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत.

29- सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आहेत.

30- सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत.

31- यवतमाळ आणि वाशिम जिल्हा यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री संजय राठोड आहेत.

32- वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत.

33- ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्याचे सध्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आहेत.