Nana Kate : …म्हणून पराभव झाला! अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी केले मान्य

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Nana Kate : काल पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीला एक तर भाजपला एक जागा मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचादेखील पराभव झाला.

या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये अश्विनी जगताप यांना 1 लाख 35 हजार 494 मतं मिळाली. तर नाना काटे यांना 99 हजार 424 मतं मिळाली. दुसरीकडे राहुल कलाटे यांनी 40 हजार 75 मत मिळाली. यानंतर आता नाना काटे यांनी पराभवाचे कारण सांगितले आहे.

ते म्हणाले, या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांनी मविआ नेत्यांच्या आग्रहानंतर उमेदवारी अर्ज मागे घेतला असता तर आज चित्र वेगळं असतं. असे त्यांनी मान्य केले आहे. चिंचडवड पोटनिवडणुकीतील पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नाना काटे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली.

चिंचवडमध्ये बंडखोरीचा फटका बसला. सगळे कार्यकर्ते प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचले. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रचार झालेला. बंडखोरीचा नक्कीच फटका बसलेला आहे. कारण ते मतदान देखील आमचंच आहे. त्यामध्ये काही वंचितचं देखील मतदान असू शकतं. ते मतदानदेखील महाविकास आघाडीचं आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, कसब्यात रवींद्र धंगेकर हे निवडून आले, याठिकाणी देखील मोठी चुरस निर्माण झाली होती. जवळपास ११ हजार मतांनी ते जिंकले. यामुळे याठिकाणी भाजपला मोठा धक्क्का बसला.