Raju Shetty : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तारांना कान धरून जाब विचारावा, राजू शेट्टी यांची मागणी..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Raju Shetty : राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत एक वक्तव्य केले आणि यामुळे मोठा वाद सुरू झाला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आजच्या नाहीत, कित्येक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतो आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. यावर आता अब्दुल सत्तार यांचे विधान संतापजनक आणि त्यांना शेतकऱ्यांबद्दल किती आपुलकी आहे हे दाखवणारेच आहे.

मुख्यमंत्र्यांनी सत्तारांचा कान धरून त्यांना या विधानाबद्दल जाब विचारला पाहिजे, अशी मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, किड्या, मुंग्यांसारखे शेतकरी मरत असताना यांना संवेदना नाहीत. विरोधकांनी देखील कृषिमंत्री सत्तारांना विधानसभेत खडसावले पाहिजे.सत्तारांचे वक्तव्य संतापजनक असून सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील नाही हे यावरून स्पष्ट होते, असेही ते म्हणाले.

शेट्टी म्हणाले, मी सत्तारांच्या वक्तव्याचा निषेध करतो. सत्तार यांच्या मतदार संघात गहू, भाजीपाला उत्पादक शेतकरी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊनही शेतकरी आत्महत्या हा जुना विषय आहे हे कृषिमंत्री सत्तार यांचे वक्तव्य अतिशय संतापजनक आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सत्तारांचा कान पकडून जाब विचारावा, असे राजू शेट्टी म्हणाले.