SambhajiRaje : छत्रपती संभाजीराजे यांनी फुंकले रणशिंग! केली मोठी घोषणा..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SambhajiRaje : आपल्या नवीन संघटनेची घोषणा केलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आता संघटना वाढीसाठी राज्यात दौरे करत आहेत. यासाठी ते रोज वेगवेगळ्या मतदार संघात जात आहेत. आता छत्रपती संभाजीराजे यांनी अखेर २०२४ साली निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे संकेत दिले आहेत.

धाराशिव येथे छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी याबद्दल मोठ वक्तव्य केले आहे. धाराशिव येथे संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेच्या ५८ शाखांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. समविचारी पक्षांला सोबत घेऊन पुढे जाऊ असेही ते म्हणाले.

ते धाराशिव दौऱ्यावर होते, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदार संघातच छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघटनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. आता ते लोकसभा, विधानसभा किती जागा लढवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संभाजीराजे यांनी आरोग्यमंत्र्यांच्या मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचे कसे हाल झाले आहेत. भूम येथील रुग्णालय महाराष्ट्रात नंबर वन हवं होतं, मात्र तशी स्थिती नाही, अशी खंत संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केली आहे.

आगामी निवडणुकीत ते कोणासोबत जाणार की एकटेच लढणार हे देखील बघणे महत्वाचं ठरणार आहे. अनेकजण त्यांच्या पक्षात देखील प्रवेश करत आहेत. यामुळे ते राज्यात दौरे करत आहेत.