Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह ‘पॉवर’फुल काकांचाही खेळी ! राजकारण ‘पवारां’भोवतीच फिरतेय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. मागील काही वर्षांचा अभ्यास केला तर अनेक संस्था, दूधसंघ, सहकारी संस्था राष्ट्रावादीकडेच आहेत. अगदी २०१९ ची विधानसभा जरी पाहिली तरी लक्षात येईल की अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीचेच बहुतांश आमदार निवडून आले होते.

त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीने आपले पाळेमुळे पक्की रोवली. दरम्यान साधारण दीड वर्षांपासून राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले. यात एक अजित पवार गट तर दुसरा शरद पवार गट. भाजपने आपला पक्ष मजबूत करण्यासाठी पक्ष फोडला असे म्हटले जाते.

परंतु अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तरी पक्ष फोडून भाजपने काय सध्या केले हे न कळण्यासारखे आहे. कारण मागील काही घटना पाहता अहमदनगरमध्ये अनेक दिग्गज मंडळी दोन गटात विभागली,

एक शरद पवार गटात तर दुसरा अजित पवार गटात व जी काही दिग्गजांची पक्षांतर झाली (इतर पक्षातून) ते एकत्र अजित पवार गटात आली किंवा शरद पवार गटात आली.

म्हणजेच एकंदरीतच काय किती पक्ष फुटला, भाजपने कितीही राजकारण केले तरी अहमदनगरमधील दिग्गज नेते हे पवारांकडेच एकवटली. मग ते पुतण्या असो वा काका राजकारण पवारांभोवतीच फिरताना दिसते.

ज्यांना काही शुल्काकाष्ठ नको असे अजित पवारांसोबत जातायेत व सत्तेत राहिल्याने फायदा करून घेतायेत तर काही एकनिष्ठ शरद पवार यांसोबतच आहेत. म्हणजेच काही झाले तरी ताकद पावरांचीच वाढली.

इतरांना काही फायदा झालाच नाही. म्हणजेच अहमदनगरमध्ये नेहमीच अ’जीत’ राहण्यासाठी पुतण्यासह काकाही ‘पॉवर’फुल खेळी करतायेत पण हे भाजपच्या ध्यानी येत नाही असा एक सूर आता नागरिकांतून निघत आहे.

 अलीकडील काही घटना पाहुयात

– शिर्डीमधील संग्राम कोते हे एक पॉवरफुल व्यक्तिमत्व ते अजित दादांनी ऍक्टिव्ह करत आपल्याकडे घेतले.

– अकोलेमध्ये असणारे आ. लहामटे हे अजित पवार गटात असल्याने लोकसभा निवडणुकांत त्यांना महायुतीच्या स्टेजवर मानाचे स्थान द्यावे लागत असून ते सांगतील ती माणसे देखील दूर ठेवावी लागत आहेत. म्हणजेच पवारांचीच ताकद. तसेच लहामटे यांच्या माध्यमातून तेथिल सहकारी संस्थाही पवारांकडेच.

– कोपरगाव, शिर्डी, राहुरी, राहता मधेही अनेक दिग्गज नेते दोन्ही पवार गटाकडे आलेली दिसली त्या तुलनेत इतर पक्षांकडे कमी दिसली असे जाणकार सांगतात.

– विखे व पवार यांमध्ये विस्तवही जात नव्हता पण आज महायुतीमुळे अजित पवारांची माणसे विखे यांना सांभाळूनच घ्यावी लागत असल्याची चित्रे आहेत.

– दक्षिणेतील पॉवरफुल दोन तालुके एक पारनेर, दुसरा श्रोगोंदे. या दोन्ही तालुक्यात जर पाहिले तर पारनेरमधील पॉवरफुल समजले जाणारे निलेश लंके शरद पवार यांसोबत आहेत. तर लंके यांना विरोध करणारे अनेक दिग्गज अजित पवारांभोवती एकवटले. बाकीच्या पक्षांचे वलय जेवढे होते तेवढेच ते सीमित राहिले.

– श्रीगोंदेचा विचार केला तर तेथे नागवडे, नाहाटा, पानसरे आदी दिग्गज अजित पवारांकडे गेली तर भोस हे शरद पवारांच्या गटाकडे जाण्याच्या वाटेवर आहेत.

एकंदरीतच काय तर शरद पवार व अजित पवार हे दोन जरी गट पडले तरी पॉवर पवारांनीच वाढली. इतर पक्षांना तुलनेत काही जास्त फायदा झालेला दिसत नाही. राजकारणात काहीही होऊ शकते हे आपण पाहिले आहे , म्हणजेच जर भविष्यात काका पुतणे एकत्र आले तर अहमदनगर जिल्ह्यात पवारच अ’जीत’ राहतील यात शंका नाही असे जाणकार म्हणतात.