जुन्नरच्या तरुण शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग ! ‘या’ जातीच्या मिरचीच्या पिकातून मिळवला एकरी साडेचार लाख रुपयांचा नफा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Junnar Successful Farmer : पुणे जिल्हा डाळिंब, अंजीर, द्राक्ष, कांदा, भात तसेच भाजीपाला उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. येथील शेतकऱ्यांनी विविध पिकं लागवडीतुन चांगले उत्पन्न मिळून दाखवले आहे. येथील शेतकऱ्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग राबवले आहेत.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे पाण्याची शाश्वत उपलब्धता असल्याने बागायती जिल्हा म्हणून पुणे जिल्ह्याची ओळख आहे. खरंतर, जुन्नर परिसरात आणि संपूर्ण तालुक्यात भात तसेच इतर बागायती पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होते.

या तालुक्यात कांद्याचे उत्पादन देखील शेतकरी मोठ्या प्रमाणात घेतात. याव्यतिरिक्त, तालुक्यातील बहुतांशी प्रयोगशील शेतकरी पारंपारिक पिकासोबतच भाजीपाला वर्गीय अर्थातच तरकारी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहेत. विशेष बाब म्हणजे या शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या लागवडीतून चांगले उत्पादनही मिळत आहे. 

हे पण वाचा :- नादखुळा ! नोकरी सांभाळत सुरू केली शेती, अंजीरच्या बागेतून साधली आर्थिक प्रगती

यात प्रामुख्याने मिरचीची लागवड येथील शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात केली जात आहे. माळशेज पट्ट्यात ओमेगा, ज्वेलरी, शिमला या मिरची वाणाची लागवड होते. मात्र, उदापूर येथील एका तरुण शेतकऱ्याने मिरचीच्या व्हीएनआर आचारी या जातीची लागवड करून लाखो रुपयांचे उत्पन्न कमवून दाखवले आहे.

संकेत गणपत म्हसने असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. संकेत यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व्हीएनआर आचारी या मिरचीच्या जातीची चार फुटाचे बेड तयार करून लागवड केली.

यासाठी मल्चिंग पेपर आणि ठिबक सिंचन प्रणालीसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी केला. तसेच लागवड केल्यानंतर पिकाची योग्य काळजी घेतली. यामुळे मात्र दीड महिन्यात या पिकातून त्यांना पहिला तोडा मिळाला आहे. पहिल्या तोड्यात त्यांना जवळपास एक टन इतके मिरचीचे उत्पादन मिळाले आहे. 

हे पण वाचा :- खरीप हंगामात मका पिकाच्या ‘या’ जातीची लागवड करा, विक्रमी उत्पादन मिळणार, वाचा….

मिरचीची विक्री त्यांनी मुंबई येथील बाजारात केली असून किलोला 35 ते 40 रुपये पर्यंतचा बाजारभाव त्यांना मिळाला आहे. त्यांनी मिरची पिकासाठी जवळपास 60,000 रुपयांचा प्रति एकर खर्च केला आहे. या पिकातून जवळपास त्यांना 15 तोडे मिळणार असून 15 ते 20 टन मिरचीचे उत्पादन मिळण्याची त्यांना आशा आहे.

जर असाच बाजारभाव पुढे ही कायम राहिला तर मिरचीच्या पिकातून त्यांना जवळपास सव्वा पाच लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न मिळण्याची आशा असून यातून खर्च वजा जाता साडेचार लाख रुपयांपर्यंतचा निव्वळ नफा मिळेल असं त्यांनी नमूद केल आहे.

निश्चितच, या तरुण शेतकऱ्यांनी या नवीन मिरचीच्या वाणाची शेती करून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवत इतरांसाठी दिशादर्शक असं काम केलं आहे यात तीळमात्र देखील शंका नाही.

हे पण वाचा :- अहमदनगरच्या शेतकरी पुत्रांनी विकसित केलं कांदा लागवडीचे यंत्र; शेतकऱ्यांचा होणार मोठा फायदा