मोठी बातमी ! शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी राज्य शासनाने घेतला ‘हा’ निर्णय, जीआर निघाला, वाचा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Farmer News : शेतकऱ्यांना गेल्या अनेक दशकांपासून नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. नुकतेच मार्च आणि एप्रिल महिन्यात देखील अवेळी कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेतीपिके या पावसाने शेतकऱ्यांकडून हिरावून घेतले यामुळे त्यांना लाखो रुपयांचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे आवश्यक आहे.

यासाठी शासनाकडून पंचनामे देखील करण्यात आले आहेत आणि नुकसान भरपाई देखील संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वितरित करण्याचे काम सुरू आहे. अशातच राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राज्य शासनाने राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्यातील सर्व भारतीय प्रशासन सेवेतील तसेच महाराष्ट्र राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

हे पण वाचा :- कापूस लागवड केलाय किंवा लागवडीच्या तयारीत असाल तर तज्ज्ञांचा ‘हा’ सल्ला वाचाच !

 या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देणगी म्हणून कापले जाणार आहे. राज्य शासनाकडून आज या निर्णयाचा शासन निर्णय अर्थातच जीआर देखील निर्गमित करण्यात आला आहे.

एका मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत.

यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून आता राज्यातील पुनर्वसनाच्या कार्याला हातभार म्हणून भारतीय प्रशासन सेवेतील, भारतीय पोलिस सेवा, राज्य शासनाच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनातून प्रत्येकी एक दिवसाचे वेतन कापून घेतले जाणार आहे.

हे पण वाचा :- घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सिडको ‘या’ भागात काढणार 5000 घरांसाठीची लॉटरी, वाचा….

याचा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून या पार्श्वभूमीवर राज्य शासकीय सेवेतील सर्व संवर्गातील विभागप्रमुख कार्यालयांना आदेश देखील देण्यात आले आहेत. विभागप्रमुखांना कर्मचाऱ्यांकडून यासाठीच्या अनुमती पत्रावर स्वाक्षऱ्या घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

एकंदरीत आता राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जून महिन्यातील वेतनातून एका दिवसाचे वेतन कपात केले जाणार आहे आणि याद्वारे जमा होणारा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा होणार आहे.

तसेच हा निधी राज्यातील अवकाळीग्रस्त आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी निश्चितच हा निर्णय दिलासा देणारा सिद्ध होणार आहे.

हे पण वाचा :- पंजाब डख यांचा हवामान अंदाज : राज्यात आजपासून पावसाला सुरवात होणार; किती दिवस पाऊस राहणार? वाचा…