महावितरणच ठरलं ! वीजबिलात ‘इतक्या’ टक्क्यांनी होणार वाढ; वीज आयोग घेणार ‘हा’ मोठा निर्णय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mahavitaran News : महावितरण लवकरच सर्वसामान्यांना एक मोठा झटका देणार आहे. हा हाय वोल्टेज झटका मागायच्या काळात सर्वसामान्यांच आर्थिक बजेट विस्कटणारा राहणार आहे. खरं पाहता वाढती थकबाकी यामुळे महावितरण गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात जात आहे. महावितरणची कोट्यावधी रुपयांची थकबाकी ग्राहकांच्या माध्यमातून अदा होत नसल्याने महावितरण तोट्यात आहे. आता ही तूट भरून काढण्यासाठी महावितरणने वीज दरवाढीचा प्रस्ताव वीज आयोगासमोर मांडला आहे.

याच प्रस्तावावर सध्या महाराष्ट्रात महावितरण बनाम सामान्य नागरिक अशी जंग पहावयास मिळत आहे. विरोधकांकडून देखील महावितरणच्या या प्रस्तावावर आक्षेप नोंदविण्यात आला आहे. सामान्य जनतेच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने केली जात आहेत. वास्तविक महावितरणने 37% वीजदर वाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. जर का हा प्रस्ताव मान्य झाला तर 2 रुपये 55 पैसे प्रति युनिट इतकी दरवाढ होणार आहे.

परंतु आयोगाच्या पुढ्यात हा प्रस्ताव आल्यानंतर यावर 15 फेब्रुवारी पर्यंत हरकती, सूचना मागवल्या गेल्या होत्या. या प्रस्तावावर अनेकांनी हरकती नोंदवल्या आहेत. मात्र असे असले तरी किमान 15% वीज दरवाढ होईल असं काही मीडिया रिपोर्टमध्ये सांगितलं जात आहे. वीज ग्राहकांच्या मते वीज बिलाची वसुली ही कठोरच होते. सामान्य नागरिकांकडून वीजबिलाची वसुली ही कठोरपणे केली जात असली तरी देखील काही ग्राहक वीज बिल भरत नाहीत परिणामी त्यांचा बोजा हा महावितरण वर पडला आहे.

आणि महावितरणने ही तूट भरून काढण्यासाठी आता वीजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे, जे की इतर नियमित वीज ग्राहकांसाठी अन्यायकारक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केल जात आहे. निश्चितच वीज आयोग या प्रस्तावावर काय निर्णय घेते आता याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. परंतु एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्टनुसार, वीज आयोग पंधरा टक्के वीजदरवाढीवर सकारात्मकचा निर्णय घेईल आणि 15% इतकी वीज दर वाढ होऊ शकते.