ब्रेकिंग ! राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची हायकोर्टात मोठी माहिती ; मुंबई-गोवा महामार्ग ‘या’ दिवशी खुला होणार, आता दोन्ही शहरांदरम्यान प्रवास 7 तासात होईल पूर्ण, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गाबाबत एक मोठी माहिती हाती आली आहे. या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सध्या स्थितीला सुरू आहे. वास्तविक, हे काम 12 वर्षांपासून रखडलेलेच होते. परिणामी महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले. त्यामुळे साहजिकच अपघातांची संख्या वाढली होती. याच पार्श्वभूमीवर कोकणातील ओवेस पेचकर यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका टाकली होती.

याच याचिकेवर मुंबई हायकोर्टात नुकतीच एक सुनावणी पार पडली. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने यावर सुनावणी घेतली. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गाच्या कामाची सद्यस्थिती न्यायालयात सांगितली गेली. 

तसेच, यावेळी महामार्ग प्राधिकरणाने फेब्रुवारी 2024 पर्यंत महामार्गाचे काम पूर्ण होईल असं सांगितलं. सध्या मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अरवली-काटे-वाकड या मार्गात सुरू असून फेब्रुवारी 2024 पर्यंत पूर्ण होईल असं सहकारी वकील पीए काकडे यांनी न्यायालयात सांगितलं. पेचकर यांनी मात्र यावर आक्षेप नोंदवला.

राज्य शासनाला महामार्गावर होत असलेल्या अपघातांसाठी जबाबदार ठरवले. न्यायालयाने मात्र कामावर संतुष्टी दाखवली आणि सुनावणी तहकुब केली. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हा महामार्ग बारा वर्षांपूर्वीच मंजूर झाला. मुंबईहून गोव्याला आणि कोकणात जाणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन हा महामार्ग रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. पनवेल जवळील पळस्पे ते इंदापूर हा चौपदरीकरण रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार केला जात आहे.

दरम्यान या रस्त्याचे काम 2017 मध्ये सुरू झाले. 80 टक्के भूसंपादन पूर्ण झाल्यानंतर या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली होती. विशेष म्हणजे या टप्प्याचे जलद गतीने काम व्हावे या अनुषंगाने एकूण दहा पॅकेज मध्ये या मार्गाचे काम विभागून कंत्राटदार नेमणूक करण्यात आली. दरम्यान आता इंदापूर ते झारप या 355 किलोमीटरपैकी 243 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम लवकरच होणार असल्याचे चित्र आहे.

फेब्रुवारी 2024 मध्ये हे काम पूर्ण केलं जाईल असं NHI कडून सांगितलं गेलं असल्याने यामुळे कोकणवासीयांना दिलासा लाभणार आहे. या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते गोवा अवघ्या सात तासात प्रवास शक्य होणार असल्याचा दावा मात्र केला जात आहे.

मोठी बातमी ! मुंबई-गोवा महामार्गाबाबत राज्य सरकारने केली ‘ही’ मोठी घोषणा ; आता मुंबई-गोवा प्रवास होणार सुखकर