Panjabrao Dakh : पंजाबराव डख नंतर आता भारतीय हवामान विभागाचा पावसाचा अंदाज, ‘या’ दिवशी होणार पाऊस; दोघांच्या अंदाजामधील फरक, वाचा सविस्तर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh : परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपला हवामान अंदाज सार्वजनिक केला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात चार तारखेनंतर हवामान खराब होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी एक ते चार तारखे दरम्यान आपल्या रब्बी हंगामातील काढणी योग्य पिकांची हार्वेस्टिंग पूर्ण करून घ्यावी. पंजाब रावांनी 4 मार्च ते 10 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज बांधला आहे.

त्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नासिक, अहमदनगर, शिर्डी तसेच पश्चिम विदर्भ, मराठवाडा याशिवाय माजलगाव आणि शिरूर भागात पावसाची शक्यता आहे. दरम्यान आज नाशिक जिल्ह्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. यामुळे पंजाबरावांचा अंदाज तंतोतंत खरा ठरणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे.

यामुळे निश्चितच रब्बी हंगामातील पीक काढणीसाठी तयारी करत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान आता पंजाबरावांनंतर भारतीय हवामान विभागाने देखील आपला अंदाज वर्तवला आहे. राज्यात चार ते सहा मार्च दरम्यान पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने वर्तवल आहे. राज्यातील काही भागातच मात्र पावसाची शक्यता असल्याचे मत जेष्ठ हवामान तज्ञ के एस होसालिकर यांनी व्यक्त केल आहे. त्यांच्या मते कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पाऊस कोसळण्याचे चित्र आहे.

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी, उत्तर कोकण आणि विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. 5 मार्च रोजी विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर अमरावती अकोला बुलढाणा या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. मात्र ६ मार्च रोजी संपूर्ण विदर्भात पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर कोकणात पाऊस पडेल मात्र खूपच तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

यासोबतच मराठवाड्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. एकंदरीत पंजाबराव डख आणि भारतीय हवामान विभागातील ज्येष्ठ हवामान तज्ञांनी वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार, महाराष्ट्रात चार तारखेपासून पावसाची शक्यता आहे. पंजाबरावांनी दहा तारखेपर्यंत वातावरण खराब राहील असं सांगितलं आहे तर हवामान विभाग मात्र सहा तारखेपर्यंतच वातावरण खराब राहणार असल्याचे सांगत आहे.