Snake Viral News : भारतात सापाच्या शेकडो प्रजाती आढळतात. भारतात आढळणाऱ्या सापांच्या जाती या विषारी, बिनविषारी आणि निमविषारी आहेत. मात्र यातील बहुतांशी जाती बिनविषारीच असतात आणि अशा बिनविषारी सापांच्या चावण्यामुळे मृत्यू होत नाही, पण तरीही सरपंच झाल्यानंतर औषधोपचार करणे, वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक आहे.
दरम्यान भारतात आढळणाऱ्या बहुसंख्य जाती बिनविषारी असतानाही देशात सर्पदंशामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. एका अनाधिकृत आकडेवारीवर जर विश्वास ठेवला तर देशात दरवर्षी 90 हजाराच्या आसपास लोक केवळ सर्पदंशामुळे मरण पावतात.

नक्कीच हा आकडा काळजाची धडकी भरवणाराच आहे आणि यामुळे आपण सारे जण सापांना घाबरतो. सध्या पावसाळ्याचा सिझन सुरू आहे आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात हिरवळ तयार झाली आहे. छोटी मोठी झाडे-झूडपे हिरवळीने सजलेली आहेत.
दरम्यान, या अशा हिरवळीच्या ठिकाणी साप निघण्याची शक्यता अधिक असते. कारण अशा ठिकाणी साप आपल्या भक्षाच्या शोधात येतो. पावसाळ्यात साप तसेच सापांची पिल्ले आपल्याला पाहायला मिळू शकतात.
पण सापांची पिल्ले असली म्हणून त्यांच्या जवळ जाऊ नका कारण की भारतात सापांच्या अशा काही जाती आहेत ज्यांची पिल्ले सुद्धा वयस्क सापांप्रमाणेच घातक आहेत. म्हणजेच या जातीच्या सापांची पिल्ले जरी चावली तरी देखील माणूस दगावण्याची शक्यता असते.
या सापांच्या पिल्लांपासून सावध रहा.

सॉ-स्केल्ड वायपर (फुरसे) : या जातीचा साप भारतात आढळणारा एक विषारी साप आहे. या सापाच्या त्वचेवर जाळीदार डिझाईन असते व ती खरखरीत असते. धोका वाटल्यास हा साप त्वचा घासून “हिस्सिंग” असा आवाज काढत असतो.
याचे विष रक्त तयार होण्याची प्रक्रिया बिघडवते, यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव होतो आणि वेळेवर उपचार न झाल्यास मृत्यू होतो. या विषारी सापांची पिल्ले सुद्धा घातक ठरतात.

कॉमन करॅत (मण्यार) : हा सुद्धा विषारी साप आहे आणि या सापांची पिल्ले सुद्धा घातक ठरू शकतात. यामुळे या सापापासून नेहमीच लांब राहिले पाहिजे. हा साप रात्री सक्रिय असतो. हा साप झोपेत असलेल्या व्यक्तींना चावतो.
अनेकदा साप चावलेले समजत नाही कारण की हा साप चावला तरी देखील सुरुवातीला काहीच भास होत नाही. अगदी मुंगी चावल्याप्रमाणे किंवा डास चावल्याप्रमाणे हा साप चावत असतो. पण याचे विष मज्जासंस्थेवर परिणाम करून श्वास घेणे कठीण करते.

बँडेड करॅत : काळ्या-पिवळ्या रंगाच्या या सापाच्या पिल्ल्यांना लोक सुंदर समजतात. पण या सापाचे पिल्ले सुद्धा घातक ठरू शकतात. याचे विष स्नायूंवर परिणाम करून श्वसनक्रिया थांबवते. योग्य वेळी लस न दिल्यास काही तासांत मृत्यू होतो. यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

इंडियन कोब्रा (नाग) : भारतीय उपखंडात आढळणारा सर्वात कॉमन साप म्हणजे इंडियन कोब्रा. हा साप फण असल्यामुळे लवकर ओळखता येतो पण हा एक विषारी साप आहे. आणि याचे पिल्ले सुद्धा विषारी असतात.
म्हणजेच या सापांची पिल्ले सुद्धा घातक ठरू शकतात याचे विष मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करते. पिल्ल्यांनी चावले तरी मृत्यू होऊ शकतो असे जाणकारांचे म्हणणे आहे.

रसेल वायपर (घोणस) : हा सुद्धा एक विषारी साप आहे आणि याचे पिल्ले सुद्धा घातक ठरू शकतात. याचा रंग तपकिरी असून पाठीवर गोल डिझाईन असते. याचे विष अतिशय जहाल असते.
हा साप चावल्या बरोबर तीव्र वेदना, सूज आणि रक्तस्त्राव होतो. हा साप चावल्याने सर्वाधिक मृत्यू होत असल्याची नोंद करण्यात आली आहे. यामुळे यापासून सावध राहणे आवश्यक आहे.