मोठी बातमी ! ‘या’ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त राज्य कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय; आता जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee News : अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक मोठा निर्णय झाला आहे. वास्तविक आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्तीच्या काही ठराविक कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे असा नियम आहे. अशा परिस्थितीत आता एसटी महामंडळाकडून आपल्या आरक्षित जागेवर अनुकंपा तत्त्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

एसटी महामंडळाने घेतलेल्या या निर्णयानुसार अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी विहित कालावधीत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही खुल्या प्रवर्गात केली जाईल. म्हणजेच या कर्मचाऱ्यांना भविष्यात आरक्षणाचे कोणतेच लाभ अनुज्ञय होणार नाहीत.

यासंदर्भात एसटी महामंडळाकडून नुकतेच एक सविस्तर असं परिपत्रक निर्गमित करण्यात आल आहे. म्हणजे आता एसटी महामंडळाने निर्गमित केलेल्या या परिपत्रकानुसार, आरक्षित जागेवर अनुकंपा तत्वावर जर एखाद्या कर्मचाऱ्याला नियुक्त करण्यात आलं असेल तर त्या कर्मचाऱ्याला विहित कालावधीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलेडीटी सर्टिफिकेट महामंडळाकडे सादर करणे अनिवार्य राहणार आहे.

मात्र जर अशा नियुक्त कर्मचाऱ्यांनी आरक्षित जागेवर नियुक्ती मिळवल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही अथवा त्या संबंधित कर्मचाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध ठरले तर अशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही आरक्षित जागेवरून खुल्या प्रवर्गात केली जाईल. या कर्मचाऱ्याला आरक्षित जागेसाठी मिळणारे कोणतेच लाभ अनुज्ञय राहणार नाहीत.

तसेच ज्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही खुल्या प्रवर्गातून झाली असेल मात्र असा कर्मचारी जर आरक्षित प्रवर्गातून असेल म्हणजेच एससी, एसटी, एनटी, वी जे एन टी, ओबीसी प्रवर्गातून असेल आणि अशा कर्मचाऱ्याला आरक्षणाचे लाभ घ्यायचे असतील तर अशांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

अन्यथा अशा कर्मचाऱ्यांना देखील आरक्षणाचे कोणतेच लाभ वर्ग केले जाणार नाहीत मिळणार नाहीत असे या परिपत्रकात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. निश्चितच एसटी कर्मचाऱ्यांसाठी ही एक कामाची बातमी असून याची दखल सर्व कर्मचाऱ्यांनी घेणे अनिवार्य राहणार आहे.