संपात सामील झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी; आता ‘हे’ काम करावं लागणार, नाहीतर….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

State Employee Strike : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना या आपल्या मुख्य मागणीसाठी 14 मार्चला संप पुकारला होता. 14 मार्च 2023 रोजी सुरू झालेला हा राज्यव्यापी संप 21 मार्च 2023 रोजी मागे घेण्यात आला. या संपाच्या कार्यकाळात मात्र शासकीय कार्यालय बंद असल्याने अनेक कामे खोळंबली आहेत. जवळपास 18 लाख शासकीय कर्मचारी संपावर असल्याने या संपाचा विपरीत परिणाम सर्वसामान्य जनतेला देखील भोगावा लागला.

दरम्यान आता संप काळात ठप्प पडलेल्या कामकाजाबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून संप काळातील प्रलंबित कामे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी मार्गी लावण्यासाठी 25 आणि 26 मार्च रोजी अर्थातच शनिवारी आणि रविवारी देखील कार्यालय सुरू ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. यासाठी संचालनालयाकडून एक परिपत्रक काढण्यात आल आहे.

हे पण वाचा :- कडू कारल्याने शेतकऱ्याच्या आयुष्यात आणला गोडवा! 3 एकरात लागवड केली अन तब्बल 10 लाखांची कमाई झाली, वाचा ही यशोगाथा

हे परिपत्रक राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुंबईच्या शिक्षण निरीक्षकांना जारी करण्यात आले आहे. खरं पाहता हे चालू आर्थिक वर्ष संपण्यासाठी केवळ सहा दिवसांचा कालावधी शेष आहे. यानंतर नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण संचालनालयाकडून या चालू आर्थिक वर्षात तरतूद झालेल्या आणि सुधारित अंदाजपत्रकामध्ये नमूद करण्यात आलेली तरतूद वेळेतच खर्ची करण्यासाठी आदेश काढण्यात आले आहेत.

तरतूदिची रक्कम शंभर टक्के उपलब्ध होणार असल्याचे सांगितले गेले असून आता ही रक्कम वेळेतच संपूर्ण खर्च करण्याचे नियोजन आहे. यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले आहेत. 6 फेब्रुवारीच्या शासनाच्या निर्णयानुसार नियमानुसार पात्र ठरणाऱ्या शाळांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची कार्यवाही 31 मार्चपर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे.

हे पण वाचा :- मोठी बातमी! परभणीचे हवामान तज्ञ पंजाबराव डख यांना कृषी भूषण पुरस्कार मिळणार? पहा

हाती आलेल्या माहितीनुसार, शिक्षण विभागाने दिलेल्या निधीचा वापर 31 मार्चपूर्वी करणे आवश्यक आहे. यामुळे आता शनिवारी आणि रविवारी कार्यालय सुरु राहणार असून या दोन दिवसात सर्व प्रकारची देयके मंजूर करण्याच्या कामाला गती दिली जाणार आहे.

म्हणजेच आता आवश्यक अनुदानाची रक्कम जमा करणे, वेतन जमा करण्यासाठी आवश्यक ती कामे आणि आर्थिक वर्षाअखेरची कामे पूर्ण करण्यासाठी 25 आणि 26 मार्चला कार्यालय सुरू ठेवून केली जाणार आहेत. एकंदरीत खोळंबलेली कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी हे परिपत्रक निर्गमित झाले असून आज आणि उद्या ही संबंधित शासकीय कार्यालय सुरूच राहणार आहेत.

हे पण वाचा :- खुशखबर! शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात झाली ‘इतकी’ वाढ; शासनाचा मोठा निर्णय, किती वाढणार पगार, पहा…