अरे वा! पुण्याच्या प्रयोगशील शेतकऱ्याने ‘या’ फळाच्या 81 झाडातून मिळवलं तब्बल 11 लाखांचं उत्पन्न, वाचा ही भन्नाट यशोगाथा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Successful Farmer : पुणे जिल्ह्यातील शेतकरी बांधव गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये सातत्याने बदल करत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून आपलं वेगळं पण कायमच सिद्ध करून दाखवल आहे. विशेषतः पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या प्रयोगाच्या माध्यमातून इतर प्रयोगशील शेतकऱ्यांना भुरळ पाडण्याचं काम केलं आहे.

दरम्यान तालुक्यातील दिवेगाव या गावात असाच एक कौतुकास्पद प्रयोग पाहायला मिळत आहे. दिवेगाव गेल्या काही वर्षांपासून फळबाग लागवडीसाठी विशेष ओळखल जात आहे. दिवेगाव व आजूबाजूच्या परिसरात असं म्हणण्यापेक्षा संपूर्ण पुरंदर तालुक्यात अंजीर या फळ पिकाची मोठ्या प्रमाणात शेती होते.

हे पण वाचा :- येत्या 48 तासात राज्यातील ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार; हवामान विभागाचा ईशारा, पहा तुमच्या जिल्ह्यात कस राहणार हवामान?

पुरंदरचे अंजीर सातासमुद्रपार निर्यात होत आहेत. येथील अंजिरांनी विदेशी लोकांना देखील भुरळ पाडली आहे. अंजीरव्यतिरिक्त येथील शेतकरी बांधव सिताफळ, पेरू यांसारख्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करतात आणि चांगले दर्जेदार उत्पादन मिळवतात. दिवेगाव मधील जाधववाडी येथील सुनील जाधव यांनी देखील 24 गुंठ्यात 81 अंजीर झाडांची लागवड करून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे. सुनील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या 24 गुंठ्यात अंजीरची लागवड केली आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो सावधान ! ‘या’ प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेऊ नका; कृषी विभागाचा गंभीर इशारा

लागवड करण्यापूर्वी त्यांनी आपल्या जमिनीची चांगली पूर्वमशागत केली यानंतर खड्डे खणून शेणखत आणि बुरशीनाशक टाकले आणि मग झाडांची लागवड करण्यात आली. लागवड केल्यानंतर अवघ्या दोन वर्षात यापासून त्यांना उत्पादन मिळू लागले आहे. अंजीरच्या बागेत त्यांनी कोंबडीखत, रासायनिक खत गरजेनुसार वापरले आहे. संतुलित प्रमाणात रासायनिक खतांचा वापर केला असल्याने अंजीरची बाग चांगली बहरली असून त्यांना मात्र 24 गुंठ्यात 12 ते 13 टन इतक उत्पादन मिळाले आहे. सध्या तीनशे ते साडेचारशे रुपये असा 48 अंजीरच्या पेटीला दर मिळत आहे.

हे पण वाचा :- कौतुकास्पद ! कांद्याला भाव मिळेना म्हणून पुण्याच्या शेतकऱ्याने केला ‘हा’ प्रयोग; आता लाखोंच्या घरात जातोय कमाईचा आकडा

या अंजीरच्या 81 झाडांपासून त्यांना जवळपास 11 लाखांची आत्तापर्यंत कमाई झाली आहे. निश्चितच सुनील जाधव यांनी इतर प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक असं काम केल आहे. वास्तविक पुणे जिल्ह्यातील विशेषता पुरंदर तालुक्यातील हवामान अंजीरसाठी विशेष अनुकूल असल्याचे सांगितले जाते. हेच कारण आहे की, येथील शेतकरी बांधव गेल्या अनेक वर्षांपासून अंजीर लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अशातच जाधव वाडीच्या सुनील जाधव यांचा हा प्रयोग इतरांसाठी मार्गदर्शक राहणारा आहे.

हे पण वाचा :- राज्य सरकारचा मोठा निर्णय ! आता शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क अन अधिकारीची पदे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनेच भरली जाणार?