मोठी बातमी ! सुरू होणार 10 नवीन वंदे भारत ट्रेन, महाराष्ट्रालाही मिळणार वंदे भारत एक्सप्रेसची भेट, ‘या’ तारखेला पीएम मोदी दाखवणार हिरवा झेंडा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन 2019 मध्ये सुरू झाली. पण, ज्यावेळी ही देशातील संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली हाय स्पीड ट्रेन सुरू झाली त्यावेळी ही गाडी एवढ्या लवकर रेल्वे प्रवाशांमध्ये लोकप्रिय होईल असा विचार कोणीच केला नव्हता. मात्र ही गाडी अवघ्या पाच वर्षांच्या काळात भारतीय रेल्वे प्रवाशांमध्ये खूपच अधिक लोकप्रिय ठरली आहे.

हेच कारण आहे की रेकॉर्ड वेळेत ही गाडी देशातील 41 महत्त्वाच्या मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील सात मार्ग आपल्या महाराष्ट्रातील आहेत.

राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते जालना, नागपूर ते बिलासपुर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवर या गाडीचे संचालन सुरू आहे.

अर्थातच मुंबईला आत्तापर्यंत पाच वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळालेली आहे. मात्र सांस्कृतिक राजधानी म्हणून ख्यातनाम असलेल्या पुण्याहुन अजूनही थेट वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नाही.

मुंबई ते सोलापूर या मार्गावर सुरू असलेली वंदे भारत एक्सप्रेस जरूर पुणे मार्गे धावते. मात्र थेट पुण्याहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू झालेली नसल्याने याची सल पुणेकरांना भासत आहे.

पण, आता थेट पुणे रेल्वे स्थानकावरून देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 12 मार्च 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 10 नवीन वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्या जाणार आहेत.

यामध्ये पुणे ते सिकंदराबाद आणि पुणे ते बडोदा या दोन वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश राहणार आहे. यामुळे महाराष्ट्रातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या आता 9 वर जाणार आहे.

पुणे आणि मुंबईहुन आणखी 2 गाड्या सुरु होणार

12 मार्च 2024 रोजी देशाला दहा नवीन वंदे भारत एक्सप्रेस मिळतील. यामध्ये पुणे ते बडोदा आणि पुणे ते सिकंदराबाद या पुणे शहरातून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा देखील समावेश राहणार आहे.

विशेष म्हणजे पुणे ते शेगाव आणि मुंबई ते शेगाव या दोन वंदे भारत एक्सप्रेस देखील आगामी काळात रुळांवर धावताना दिसणार आहेत.

यामुळे श्रीक्षेत्र शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील भाविकांना मोठा दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे.