World Cup 2023 : विश्वचषक जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्न अधुरे राहणार ? रवी शात्री थेटच बोलले…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

World Cup 2023 : भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी असं काहीसं म्हटलं आहे. ज्याने भारतीय चाहत्यांना अडचणीत टाकले आहे. यंदाचा विश्वचषक फक्त भारतातच होणार आहे. ICC ने अखेर मंगळवार 27 जून रोजी विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारत तब्बल १२ वर्षांनंतर विश्वचषकाचे यजमानपद भूषवणार आहे.

यावेळी भारतात होत असलेल्या विश्वचषकामुळे भारतीय संघ आणि व्यवस्थापनावर खूप मानसिक दबाव येत आहे. कारण टीम इंडियाने ट्रॉफीचा दुष्काळ संपवून ट्रॉफी उंचवावी, अशी तमाम भारतीयांची इच्छा आहे. मात्र याच दरम्यान भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी असे वक्तव्य केले आहे. ज्याने सर्वांना विचार करायला भाग पाडले आहे.

भारतीय संघाने 2011 मध्ये शेवटच्या वेळी विश्वचषक ट्रॉफी उचलली. त्यावेळी संघाची कमान महेंद्रसिंग धोनीच्या हाती होती. तेव्हापासून जवळपास 12 वर्षे झाली आहेत. मात्र भारतीय संघाला एकही विश्वचषक ट्रॉफी जिंकता आलेली नाही आणि यावेळीही भारतीय संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न केवळ स्वप्नच राहणार असल्याचे दिसते.

टीम इंडियामध्ये डाव्या हाताच्या फलंदाजांच्या कमतरतेमुळे भारतीय संघ पुन्हा एकदा ट्रॉफी जिंकू शकणार नाही, असे मत भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केले. विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेले रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले की, डावखुऱ्या फलंदाजांशिवाय विश्वचषक खेळणे भारतीय संघासाठी मोठा धक्का असू शकतो.

आपल्याला नेहमी समतोल संघाची आवश्यकता असते. सलामीवीर म्हणून तुम्ही कोणत्याही डावखुऱ्या फलंदाजाची निवड करा, असे माझे म्हणणे नाही. पण टॉप-6 मध्ये किमान दोन डावखुरे फलंदाज असणे अत्यंत गरजेचे आहे. रवी शास्त्री पुढे म्हणाले की, जेव्हा भारतीय संघाने २०११ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

त्यानंतर संघात गौतम गंभीर, युवराज सिंग आणि सुरेश रैना या डावखुऱ्या फलंदाजांचा समावेश होता. त्यामुळे संघात परिपूर्ण संतुलन निर्माण झाले. हा विश्वचषक 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल. एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. आणि त्याचा अंतिम सामना 19 नोव्हेंबरला होणार आहे. भारतीय संघाचा पहिला विश्वचषक सामना 8 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला जाणार आहे.