“आम्हाला बोलवायचे असेल तर भाजपलाही बोलवावं लागेल”

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती तुटल्यानंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपद घेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले पण ३ पक्ष एकत्र म्हणजे अंतर्गत धूसपूस तर होणारच. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केला आणि महाविकास आघाडीला सत्तेतून बाहेर पडावं लागलं. राज्याच्या राजकारणाची नवी समीकरणं तयार झाली. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी … Read more

मी कधीच कोणासमोर लोटांगण घातलं नाही; भुमरेंचं राऊतांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना बंडखोर आमदारांनी चांगलंच धारेवर धरलं आहे. बंडखोरांनी राऊतांवर केलेल्या टीका आणि आरोपांना संजय राऊतांनी सकाळी पत्रकार परिषद घेत उत्तरे दिली. ‘संदीपान भुमरे हे मंत्री झाले तेव्हा सामना कार्यलयामध्ये आले आणि माझ्यासमोर लोटांगण घातलं’, असे संजय राऊत म्हणाले. राऊतांच्या या वक्तव्यावर संदीपान भुमरे यांनी आता भाष्य केले आहे. मी … Read more

राऊतांमुळे एकच नगरसेवक राहिलाय, त्यालाच आता महापौर करणारl; मनसेने उडवली सेनेची खिल्ली

मुंबई : शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे महापिलाकेमध्ये मोठं खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे अनेक ६७ नगरसेवकांपैकी ६६ नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. आता शिवसेनेमध्ये फक्त एक नगरसेवक राहिला आहे. यावरुन मनसेचे नेते गजानन काळे यांनी संजय राऊतांना खोचक टोला लगावला आहे. ‘चमत्कार बाबा’ संजय राऊत यांच्यामुळे ठाण्यात नवाब सेनेत एकच नगरसेवक राहिला. त्याला … Read more

‘मातोश्री’वरुन बोलवणे आले तर जाऊ पण…; बंडखोर आमदाराची अट

शिर्डी  :  शिवसेनेच्या आमदारांनी बंडखोरीनंतर आता ‘मातोश्री’वर जाण्याबाबत मौन सोडले आहे. शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी ‘मातोश्री’वरुन फोन आला तर जाऊ, असे वक्तव्य केले आहे. त्यांच्या पाठोपाठ आता शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी देखील असे वक्तव्य केले आहे. आमची तर इच्छा आहे आम्हाला उद्धव साहेबांचा फोन यावा आणि आम्हाला ‘मातोश्री’वर बोलवावे, असे सुहास कांदे … Read more

भावना गवळींऐवजी राजन विचारेंना प्रतोद केल्याचे संजय राऊतांनी सांगितले कारण

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी शिवसेनेच्या भावना गवळी यांच्या जागी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदी राजन विचारे यांची नियुक्ती करण्याचे संसदीय कार्यमंत्र्यांना पत्र पाठवले होते. ते पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक चर्चा रंगू लागल्या. याचे कारण आता संजय राऊतांनी स्पष्ट केले आहे. व्हीप बदलणे हा पक्षाचा अंतर्गत विषय आहे. लोकसभेत मुख्य प्रतोद … Read more

“संदीपान भुमरे मंत्री झाले तेव्हा त्यांनी माझ्या पायात लोटांगण घातलं, हवं तर व्हीडिओ दाखवतो”

मुंबई : शिवसेनेत मोठी पडल्यापासून शिवसेनेचे नेते एकमेकांवर आरोप टीका करत आहेत. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गेल्या २ दिवसांपासून शिवसेनेतील शिंदे गटातील बंडखोर आमदारांनी संजय राऊतांमुळेच आम्ही शिवसेना सोडल्याचे सांगितले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत आज सकाळी पत्रकार परिषद घेत मौन सोडले आहे. तसेच सर्व आरोपांना आणि टीकांना आज संजय राऊतांनी उत्तर दिले आहे. … Read more

…म्हणून शिवसेनेने भावना गवळी यांची प्रतोद पदावरुन केली उचलबांगडी

मुंबई :  एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. राज्याच्या विधीमंडळाला देखील मोठा धोका बसला आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोद भावना गवळी यांची उचलबांगडी केली आहे. शिंदे यांच्या बंडानंतर भावना गवळी यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले होते. यामध्ये भावना गवळी यांनी एकनाथ शिंदे यांची भूमिका उचलून धरली होती. त्यानंतर … Read more

संजय राऊतांमुळे शिवसेना फुटली; शंभूराजे देसाईंचा गंभीर आरोप

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊतांमुळेच शिवसेनेवर ही वेळ आली आहे. संजय राऊतांमुळेच पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले ४० आमदार सेनेतून बाहेर पडले. त्यांना जास्त महत्व देण्याची गरज नाही, असे म्हणत शंभूराजे देसाईंनी राऊतांवर निशाणा साधला आहे. संजय राऊतांमुळेच शिवसेना … Read more

ज्यांची नावं घेताय त्यांच्यामुळेच कालपर्यंत सत्तेत होता; संजय राऊतांचं गुलाबरावांना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूच्या लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली, असे म्हणणाऱ्या शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटलांना शिवसेनेच्या संजय राऊतांनी सडेतोड उत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये अंतर्गत वाद सुरु होता. शिवसेनेतील बंडखोर आमदारामुळे नवे सरकारदेखील स्थापन झाले. मात्र अद्यापही शिवसेनेतील वाद संपताना दिसत नाही. बंडखोरांनी ज्या चार लोकांची नावं घेतली त्या चार … Read more

पक्ष सोडणाऱ्या अशीच भाषणं करावी लागतात; राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

मुंबई : शिवसेनेत मोठी फूट पाहायला मिळाली. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील मतभेद आता आणखीनच तीव्र होत असल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बहुमत चाचणी जिंकल्यानंतर अभिनंदन ठरावाला उत्तर देताना तुफान फटकेबाजी केली. यावेळी शिंदे यांनी आपल्या भाषणातून अनेक खुलासे करत शिवसेना पक्षप्रमख उद्धव ठाकरे यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका केली. … Read more