जवळच्या व्यक्तीचे मृत्यूचे दुःख पोटात घालून आ. निलेश लंके पुन्हा मैदानात!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पारनेर तालु्क्यातील राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांच्या सामाजिक कामाचे महाराष्ट्र कौतुक करीत आहे. आपल्या कामाच्या पद्धतीमुळे ते अल्पावधीतच पक्षश्रेष्ठींचेही लाडके झालेत. स्वतःहून पवारांच्याच नावाने तब्बल अकराशे बेडचे कोविड सेंटर लंके यांनी उभारून सामान्य माणसाला मदतीचा हात दिला आहे. आमदार नीलेश लंके यांचे चुलते बाळासाहेब लंके यांचे बुधवारी रात्री … Read more

मोबाइल हॉस्पिटल कोरोना काळात ठरतेय कर्जत जामखेडकरांसाठी वरदान

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना काळातील निर्बंधांमुळे काही ज्येष्ठ नागरिक, विकलांग व्यक्ती, गर्भवती महिला यांच्यासह इतर नागरिकांना घराबाहेर पडण्यास विविधप्रकारे अडथळा येतो. तेव्हा याचे गांभीर्य लक्षात घेऊन कर्जत जामखेडमधील नागरिकांना औषधोपचारांसाठी त्रास सहन करावा लागू नये, याकरिता आमदार रोहित पवार यांंनी ‘मोबाइल हॉस्पिटल’ हा उपक्रम चार महिन्यांपूर्वी सुरु केला. गेल्या चार महिन्यांत … Read more

मारल्याचा राग आल्याने १३ वर्षीय मुलाने वडिलांची केली हत्या

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-बहिणीबरोबर झालेल्या भांडणातून वडिलांनी आपल्याला मारलं याचा राग आल्याने १३ वर्षीरू मुलाने वडिलांच्या पोटात चाकू खुपसून हत्या केली. ही घटना पुण्याच्या कात्रजमध्ये जांभूळवाडी भागामध्ये घडली. जांभूळवाडी भागामध्ये दस्तगिर हे त्यांच्या कुटुंबासह राहतात. दस्तगीर यांचा मुलगा आणि मुलगी यांचे घरामध्ये काहीतरी किरकोळ कारणावरून वाद झाले होतं. भावा बहिणीच्या नेहमीच्या भांडणासारखं … Read more

दहावीची रद्द करून बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-दहावीची रद्द करून तुम्ही बारावीची घेणार असल्याचे म्हणताय? हा काय गोंधळ आहे?’, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने दहावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबाबत राज्य सरकारला फटकारले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द केली आहे. या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णया विरोधात … Read more

‘शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार शिवसेना ०, राष्ट्रवादी १’

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राष्ट्रवादीच्या हटवादासमोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना झुकावे लागले आहे. जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना अखेर प्रशासनाकडून हिरवा कंदील मिळाला आहे. शीतयुद्धात मुख्यमंत्र्यांची हार. शिवसेना ०, राष्ट्रवादी १,” असे ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. जयंत पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत नाराजी जाहीर केल्यानंतर अखेर … Read more

…तर हा संभाजी महाराज तुम्हाला आडवा येईल’

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल. अजून मी आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी दोन मिनिटं लागतात, पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही, असा इशारा भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला. मराठा आरक्षणाबाबत ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. २७ … Read more

धक्कादायक माहिती समोर ! कारागृहात असतानाही बाळ बोठेने केले ‘त्यांना’ फोन !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या महिन्यात उपअधीक्षक अजित पाटील, पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी … Read more

‘डॅडी’ची दगळी चाळ करणार जमिनदोस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी ऊर्फ डॅडी यांचे मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळ जमिनदोस्त करण्यात येणर आहे. प्राथमिक योजनेनुसार दगडी चाळीच्या जागी ४० मजली दोन टॉवर उभारण्यात येणार आहेत. यामध्ये मूळ भाडेकरुंसाठी घरं असतील आणि उर्वरित घरं विक्रीसाठी उपलब्ध असतील. दगडी चाळीत एकूण ३३८ भाडेकरु असून अरुण … Read more

म्युकरमायकोसिसनंतर आता ह्या आजाराचा धोका !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या अाजाराने आधीच नागरिक त्रस्त झाले असताना आता व्हाइट फंगस (कँडिडोसिस) या नव्या आजाराचा धोका वाढला आहे. या व्हाइट फंगसचे रुग्ण बिहारमधील पाटण्यात चार रुग्ण आढळले आहेत. व्हाइट फंगस (कँडिडोसिस) हा फुफ्फुसासोबतच त्वचा, नख, तोंडाच्या आतील भाग, पोट आणि आतडे, किडनी, गुप्तांग आणि मेंदुला संक्रमित … Read more

कोरोनापेक्षा शहरातील निर्बंध अधिक जालिम फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना दंड करुन स्वत:ची पाठ थोपाटण्यापेक्षा अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी … Read more

आगामी १० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे : आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- महाराष्ट्राला आता म्युकरमायकोसिस या अाजाराने घेरले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, … Read more

मंत्री घरात बसून काम करतात, फडणवीस सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कोरोना काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देऊन, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत. आज अनेक नेते, मंत्री घरात बसून जपून काम करीत आहेत. मात्र, फडणवीस यांनी संकटाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. … Read more

हिवरे बाजार येथे कोवीड लसीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे कोविड -१९ च्या कोविशील्ड लसीकरणाचा दुसरा टप्पा दिनांक २० मे २०२१ रोजी यशस्वीरित्या पार पडला. यात एकूण ७० व्यक्तीना कोविशील्ड चे लसीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हिवरे बाजार येथील कोरोनाच्या विविध पथकात काम करण्याऱ्या स्वयसेवकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. त्यात विशेष म्हणजे कुटुंब सर्वेक्षण … Read more

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू , जाणून घ्या तुमच्या परिसरातील कोरोनाचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्ह्यात आज ४१०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू झाले आहेत,अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत … Read more

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी 861 कोटी 40 लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास … Read more

माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे ३० मे २०१६ रोजी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळवला होता. निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता २ कोटी रुपये … Read more

तब्येतीची काळजी घे, पवारांचा अहमदनगर जिल्ह्यातील त्या आमदारास सल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव विधानसभा मतदारसंघात बाधित रुग्णांसाठी तू करीत असलेले काम अतिशय उत्तम आहे. तुझी जबाबदारी तू प्रामाणिकपणे पार पाडीत आहे. मात्र, या संकटात तू जशी इतरांची काळजी घेतो, तशीच काळजी तुझ्या देखील तब्येतीची घे, असा भावनिक सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदार आशुतोष काळे यांना दिला.आमदार आशुतोष काळे … Read more

नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी … Read more