iQOO smartphones : “या” दिवशी लॉन्च होणार iQOO Neo 7 SE फोन, बघा फीचर्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iQOO smartphones : iQOO Neo 7 SE च्या लॉन्चची तारीख निश्चित झाली आहे. बर्‍याच दिवसांपासून समोर येत असलेल्या लीक्समध्ये लॉन्च होण्यापूर्वीच स्मार्टफोनचे खास स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. कंपनीचा हा प्रीमियम फोन पुढील महिन्यात लाँच होणार असल्याचे बोलले जात आहे. लॉन्चच्या तारखेसह, ब्रँडने फोनचा प्रोसेसर देखील उघड केला आहे. यात नवीन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर मिळेल.

iQOO Neo 7 सीरीजचा हा दुसरा स्मार्टफोन असेल. याआधी, कंपनीने या वर्षाच्या सुरुवातीला या मालिकेत निओ 7 लॉन्च केला होता. iQOO लॉन्च होणाऱ्या फोनचा एक टीझर व्हिडिओ देखील जारी केला आहे, ज्यामध्ये फोनची रचना समोर आली आहे. या आगामी स्मार्टफोनची लॉन्च तारीख आणि स्पेसिफिकेशन जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर…

iQOO Neo 7 SE के सभी फ़ीचर लीक, Dimensity 8200 व 120W फ़ास्ट चार्जिंग के  साथ होगा लॉन्च

iQOO Neo 7 SE लाँचची तारीख

iQOO ने अधिकृतपणे एका टीझर शेअर केला आहे. यामध्ये फोनच्या लॉन्चची पुष्टी केली आहे. यासोबतच त्याची रचनाही समोर आली आहे. हा फोन 2 डिसेंबरला लॉन्च होईल.

टीझरमध्ये दिसत आहे की, फोनमध्ये चौरस आकाराचे कॅमेरा मॉड्यूल आहेत. त्याच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. कंपनीने फोनचा फ्रंट लूक शेअर केलेला नाही.

iQOO Neo 7 SE specifications tipped ahead of launch

हे फीचर्स फोनमध्ये मिळू शकतात

फीचर्सबद्दल बोलताना कंपनीने पुष्टी केली आहे की फोन MediaTek Dimensity 8200 प्रोसेसर सह लॉन्च करण्यात आला आहे. याशिवाय iQOO ने हे देखील उघड केले आहे की फोन 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल.

इतर लीक झालेल्या तपशीलांनुसार, iQOO Neo 7 SE तीन रंग पर्यायांमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो ब्लॅक, इलेक्ट्रिक ब्लू आणि गॅलेक्सी. 12GB पर्यंत RAM सह 128GB अंतर्गत स्टोरेज मिळण्याची अपेक्षा आहे. हँडसेट 5000mAh बॅटरीने सुसज्ज आहे.

iQoo Neo 7S, iQoo Neo 7 SE live image & key specifications leaked

डिव्हाइसमध्ये 6.78-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला जाईल. त्याचा रिफ्रेश रेट 120Hz असेल. फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. अलीकडील लीक्सवरून असे दिसून आले आहे की डिव्हाइसला 64MP मुख्य कॅमेरा, 2MP पोर्ट्रेट लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सर मिळू शकतो.