Jio Recharge Plan : जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! 75 रुपयांमध्ये मिळणार अमर्यादित कॉलिंग, डेटा आणि अनेक फायदे, पहा प्लॅन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होत आहे. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीकडून हे रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत.

जिओकडून ग्राहकांना परवडणारे रिचार्ज प्लॅन सादर केले जात आहेत. आपल्या ग्राहकांची विशेष काळजी घेत, कंपनी अनेक OTT प्लॅटफॉर्मसाठी अधिक दिवसांची वैधता, डेटा आणि विनामूल्य सदस्यता लाभांसह स्वस्त योजना देखील ऑफर करते.

जिओकडून ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅन ऑफर फक्त जिओ फोनसाठी दिली जात आहे. त्यामुळे जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी चांगला फायदा होत आहे. या रिचार्ज प्लॅनमध्ये जिओ ग्राहक कॉलिंग आणि फ्री एसएमएससह अधिक दिवसांची वैधता आणि डेटा लाभ घेऊ शकतात.

Jio ग्राहकांसाठी हे आहेत सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही जिओ फोन वापरत असाल तर तुमच्यासाठी 75, 91, 125, 152 आणि 186 रुपयांचे प्लॅन आहेत. या रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि डेटा तसेच अनेक फायदे मिळणार आहेत.

रिलायन्स जिओचा 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

JioPhone ग्राहकांसाठी कंपनीकडून 75 रुपयांचा प्लॅन ऑफर करण्यात आला आहे. या प्लॅनची वैधता 23 दिवस आहे. तसेच 0.1MB दैनिक इंटरनेट आणि एकूण 200MB अतिरिक्त डेटा या प्लॅनमध्ये दिला जात आहे. तसेच अमर्यादित कॉलिंग आणि 50 मोफत एसएमएस देखील दिले जात आहेत.

जिओचा 91 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओकडून जिओ फोन ग्राहकांना 91 रुपयांना प्लॅन देत आहे. या प्लॅनची मुदत 28 दिवसांची आहे. तसेच या प्लॅनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना दररोज 0.1MB डेटा दिला जातो. याशिवाय, तुम्हाला 200MB अतिरिक्त डेटा देखील दिला जातो. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंगसह 50 मोफत एसएमएस दिले जात आहेत.

जिओ 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ ग्राहकांना आणखी एक स्वस्त रिचार्ज प्लॅन कंपनीकडून ऑफर करण्यात येत आहे. जिओ फोन वापरकर्त्यांसाठी 125 रुपयांचा रिचार्ज प्लॅन २३ दिवसांच्या मुदतीसह देण्यात येत आहे. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 0.5 MB डेटा दररोज दिला जातो. यासोबत तुम्ही 300 मोफत एसएमएसचा लाभ घेऊ शकता.

जिओचा 152 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ फोन ग्राहकांसाठी कंपनीकडून आणखी एक 152 रुपयांचा स्वस्त रिचार्ज प्लॅन दिला जात आहे. या प्लॅनची वैधता २८ दिवसांची आहे. सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 0.5 MB डेटा दररोज दिला जातो. यासोबत तुम्ही 300 मोफत एसएमएसचा लाभ घेऊ शकता.

जिओ 186 रुपयांचा रिचार्ज प्लॅन

जिओ फोन वापरणाऱ्यांसाठी ग्राहकांना आणखी एक आणि शेवटचा स्वस्त रिचार्ज प्लॅन म्हणजे 186 रुपयांचा आहे. या प्लॅनची मुदत 28 दिवसांची आहे. सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येत आहे. तसेच 00 मोफत एसएमएस आणि दररोज 1GB डेटा देखील दिला जात आहे.