128GB स्टोरेजसह Lenovoचा नवीन टॅबलेट लाँच; फीचर्स आहेत एकदम कमाल…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Lenovo ने 29 ऑगस्ट 2022 रोजी भारतात आपला नवीन टॅबलेट लॉन्च केला. चीनी टेक कंपनीने आपल्या नवीनतम पोर्टफोलिओमध्ये Tab M10 Plus (3rd Gen) चा समावेश केला आहे. नवीन लाँच झालेल्या Android टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट आहे. या टॅबलेटला 10.61 इंच 2K IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की या डिव्हाईसमध्ये पॉवरफुल प्रोसेसरसह सर्वोत्तम मल्टीमीडिया अनुभव मिळेल.

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) किंमत

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) फक्त Wi-Fi आणि LTE प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. केवळ वाय-फाय व्हेरिएंटची किंमत 19,999 रुपये आहे. त्याच वेळी, LTE वेरिएंटची किंमत 21,999 रुपये आहे.

हा नवीन Lenovo Android टॅबलेट Amazon India आणि Lenovo च्या वेबसाइटवरून खरेदी करता येईल. याशिवाय हा टॅब ऑफलाइन स्टोअरमधूनही खरेदी करता येईल. हे उपकरण स्टॉर्म ग्रे आणि फ्रॉस्ट ब्लू रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Lenovo M10 Plus (3rd Gen) तस्पेसिफिकेशन्स

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) मध्ये 10.61 इंच 2K IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनचा आस्पेक्ट रेशो 15:9 आहे आणि रिझोल्यूशन 2,000 x 1,200 पिक्सेल आहे. या टॅबलेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट देण्यात आला आहे. या लेनोवो टॅबलेटमध्ये 4 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) चे वजन सुमारे 465 ग्रॅम आहे. कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, लेनोवोच्या या नवीन टॅबलेटमध्ये 5 मेगापिक्सेलचा फ्रंट आणि रियर कॅमेरा आहे. या लेनोवो टॅबलेटला पॉवर देण्यासाठी 7700mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Lenovo Tab M10 Plus (3rd Gen) वर 4 तासांचा स्टँडबाय वेळ, 60 तासांचा म्युझिक प्लेबॅक वेळ, 12 तासांपर्यंत ऑनलाइन व्हिडिओ प्लेबॅक आणि 14 तासांपर्यंत वेब ब्राउझिंग वेळ प्रदान करण्याचा दावा केला जातो.