Mid Range 5G Smartphone : नवीन फोन खरेदी करायचाय पण बजेट कमी आहे? 5000mAh बॅटरीसह येणारे ‘हे’ फोन आहेत तुमच्यासाठी बेस्ट, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mid Range 5G Smartphone : भारतीय बाजारात प्रत्येक वर्षी हजारो स्मार्टफोन लाँच केले जातात. त्यापैकी काही स्मार्टफोनच्या किमती खूप जास्त असतात. तर काही स्मार्टफोनच्या किमती खुप कमी असतात. अशातच जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे पण तुमचे बजेट खूप कमी असेल तर काळजी करू नका.

कारण असेही काही 5G स्मार्टफोन आहेत जे तुम्ही 20 हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. यात 5000mAh बॅटरी दिली जात आहे. इतकेच नाही तर यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देण्यात येत आहे. पहा त्यांची सविस्तर यादी.

Samsung Galaxy F23 5G

हा फोन एकाधिक 5G कनेक्टिव्हिटी स्पेक्ट्रम बँडसह येत असून यात तुम्हाला 6.6 इंचाची मोठी स्क्रीन पाहायला मिळेल. जे TFT LCD डिस्प्ले आणि 120Hz च्या रिफ्रेश रेटसह येतो. हे 1080 x 2408 पिक्सेल रिझोल्यूशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 स्क्रीन संरक्षणासह येत असून यात तुम्हाला Snapdragon 750G प्रोसेसर आणि Android 12 OS वर चालतो.या फोनच्या मागील बाजूस 50MP+8MP+2MP ट्रिपल रिअर कॅमेरा उपलब्ध असून यात सेल्फी घेण्यासाठी 8MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. हा 5000mAh बॅटरीसह सुसज्ज असणार आहे, जो 25W चार्जिंग सपोर्टसह येते. किमतीचा विचार केला तर फोनची किंमत 14,999 रुपये आहे.

Poco X5 5G

हा फोन गेल्या वर्षी आलेल्या POCO X4 Pro चा एक प्रकार म्हणून घेतला जाईल. या फोनची रचना त्याच्याशी मिळतेजुळते आहे. Poco X5 5G च्या 12 स्पेक्ट्रम बँड सपोर्टसह येत असून यामध्ये तुम्हाला 6.67 इंचाची मोठी स्क्रीन पाहायला मिळेल, जी सुपर AMOLED डिस्प्ले आणि 120Hz रिफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येईल.

तर स्क्रीनच्या संरक्षणासाठी यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे. यात स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरने सुसज्ज असून जो Android 12 OS वर चालतो.या फोनमध्ये मागील बाजूस 48MP+8MP+2MP ट्रिपल रिअर कॅमेरा दिला आहे, सेल्फी घेण्यासाठी 13MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात 5000mAh बॅटरी दिली असून, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन तुम्ही फ्लिपकार्टवरून 15,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Redmi Note 12 5G

हा फोन उत्तम डिझाइनसह येतो. याच्या बॅटरी लाइफपासून ते डिस्प्ले आणि कॅमेर्‍यापर्यंत यात मजबूत फिचर दिले आहे. या फोनच्या स्क्रीनबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.67-इंचाचा AMOLED डिस्प्ले दिला आहे, जो 120Hz च्या रीफ्रेश रेटसाठी सपोर्टसह येतो. तसेच डिस्प्लेच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 दिला आहे.

यामध्ये Snapdragon 4 Gen 1 प्रोसेसर आणि Android 12 OS साठी सपोर्ट आहे. या फोनच्या मागील बाजूस 48MP+8MP+2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात तुम्हाला 5000mAh बॅटरी मिळणार असून जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन 22 मिनिटांत 50 टक्के चार्ज होईल असा दावा कंपनीने केला आहे. फोनची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे.

Samsung Galaxy A14 5G

सॅमसंगचा हा हा फोन त्याच्या किंमतीनुसार चांगल्या फीचर्ससह येतो, ज्यात त्याची कार्यक्षमता, कॅमेरा आणि बॅटरीचे आयुष्य यांचा समावेश आहे. या फोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास तो Exynos 1330 चिपसेटने सुसज्ज आहे, जो Mediatek Dimensity 700 प्रोसेसर आणि Android 13 OS वर चालतो.

यात 6.6-इंचाचा PLS LCD डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. यामध्ये तुम्हाला 50MP+2MP+2MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि मागील बाजूस 13MP फ्रंट कॅमेरा मिळेल. ज्यामुळे तुम्ही याचा दीर्घकाळ वापर करू शकता, या फोनमध्ये 5000mAh बॅटरी बसवली आहे, जी 15W चार्जिंग सपोर्टसह येते. याची सुरुवातीची किंमत 15,990 रुपये इतकी आहे.

Oneplus Nord CE 3 Lite 5G

वनप्लसचा हा फोन या सेगमेंटमधील सर्वोत्तम फोनमध्ये खरेदी करता येऊ शकतो. यात उत्तम कॅमेरा, मजबूत प्रोसेसर तसेच मजबूत बॅटरी दिली आहे. त्याच्या कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाल्यास तो 108MP+2MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP फ्रंट कॅमेरासह येतो. ज्यामुळे सुंदर फोटो क्लिक करता येतात.

यामध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला आहे आणि तो Android 13 वर चालतो.त्याच्या डिस्प्लेबद्दल बोलायचे झाले तर, यात 6.72-इंचाची IPS LCD स्क्रीन दिली आहे, जी 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. यामध्ये 5000mAh बॅटरी दिली असून जी 67W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. हा फोन फक्त 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. फोनची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये इतकी आहे.