Oppo ची धमाकेदार ऑफर! 5G स्मार्टफोनवर मिळावा ‘इतका’ ऑफ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Oppo 5G : आजकाल ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सामानावर जोरदार सेल सुरु आहे. फ्लिपकार्टवर हा सेल 17 जुलैपर्यंत चालणार आहे, ज्यामध्ये अनेक ऑफर्स देण्यात येत आहेत. जर तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही फ्लिपकार्टवर सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स सेल दरम्यान अनेक ऑफर्सचा लाभ घेऊ शकता.

Flipkart वर चालू असलेल्या सेल दरम्यान Oppo K10 5G स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात सूट मिळत आहे. Oppo K10 5G स्मार्टफोनच्या मुख्य वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे झाल्यास, फोन 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, 5000mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 810 प्रोसेसरसह लॉन्च करण्यात आला आहे. आज आम्ही तुम्हाला Oppo K10 5G स्मार्टफोनवरील डिस्काउंट, स्पेसिफिकेशन्स आणि फोनच्या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती देणार ​​आहोत.

Oppo K10 5G ऑफर

Oppo K10 5G स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर 17,499 रुपयांना लिस्ट झाला आहे. या Oppo फोनवर बँक ऑफ बडोदा क्रेडिट कार्डवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे. बँक ऑफ बडोदाचे ग्राहक हा फोन फक्त Rs.15,999 मध्ये खरेदी करू शकतात यासोबतच SBI क्रेडिट कार्डवर 500 रुपये, ईएमआय व्यवहारावर 1500 रुपयांची सूट उपलब्ध आहे. एवढेच नाही तर ओप्पोच्या या 5G स्मार्टफोनवर जुन्या स्मार्टफोनची देवाणघेवाण करून अतिरिक्त सवलत देखील मिळू शकते.

OPPO K10 5G स्पेसिफिकेशन

-90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD LCD पॅनेल
-मीडियाटेक डायमेन्सिटी 810 प्रोसेसर
-5,000mAh बॅटरी, 33W जलद चार्ज
-8GB 5GB रॅम, 128GB स्टोरेज
-48MP 2MP ड्युअल रियर कॅमेरा
-8MP सेल्फी कॅमेरा
-Android 12 वर आधारित ColorOS 12.1

OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये 6.56-इंचाचा HD डिस्प्ले आहे. या फोनमध्ये LCD डिस्प्ले पॅनल आहे, ज्याचा रिफ्रेश दर 90Hz आहे. हा Oppo फोन MediaTek च्या Dimensity 810 प्रोसेसर सह सादर करण्यात आला आहे. Oppo च्या या फोनला 5,000mAh बॅटरी आणि 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच OPPO K10 5G स्मार्टफोनमध्ये 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम आहे. या फोनची रॅम 5GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

OPPO K10 5G च्या कॅमेरा स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे झाले तर फोन मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा फ्रंट कॅमेरा 48MP आहे, ज्यामध्ये 2MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. या Oppo फोनमध्ये 8MP सेल्फी कॅमेरा आहे. OPPO K0 5G स्मार्टफोन Android 12 वर आधारित Color OS 12.1 वर चालतो. या Oppo फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.