Smart LED TV : सोडू नका अशी संधी! 10 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतात ‘हे’ स्मार्टटीव्ही, पहा यादी

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smart LED TV : मार्केट्मध्ये स्मार्ट एलईडी टीव्हीची मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक कंपन्या आपले स्मार्ट एलईडी टीव्ही लौणच करू लागल्या आहेत. परंतु मागणी जास्त असल्याने या टीव्हींच्या किमती खूप आहेत. परंतु आता तुम्ही हे टीव्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचतील. अशी शानदार संधी तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर मिळत आहे. या ठिकाणी ब्रँडेड टीव्हीवर आतापर्यंतची सर्वात मोठी सवलत मिळत आहे. जाणून घ्या संपूर्ण ऑफर आणि नवीनतम किमती.

स्कायवॉल 32 इंच एचडी रेडी एलईडी टीव्ही 32SWATV ग्रेड पॅनेलसह (स्लिम बेझल)

स्कायवॉलचा हा 32 इंचाचा HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही असून वेबसाइटवर 3.5 स्टार रेटिंगसह उपलब्ध आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे की हा सर्वात स्वस्त 32 इंचाचा एलईडी टीव्ही असून किंमत 6,999 रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे हा फ्रेमलेस एलईडी टीव्ही असूनही, त्याची किंमत जास्त नाही.

असे असल्याने त्याची जोरदार विक्री होत आहे.जर त्याच्या मूळ किंमतीबद्दल बोलायचे झाले तर ती 15810 रुपये इतकी आहे परंतु आता त्यावर सर्वात मोठी सवलत दिली जात आहे. त्यानंतर त्याची किंमत केवळ 6,999 रिपाई इतकी होईल. या LED TV मध्ये तुम्हाला वायफाय कनेक्टिव्हिटी, 1GB RAM आणि 8GB स्टोरेज, 30 वॉट लाऊड ​​स्पीकरसह क्वाड कोर प्रोसेसर यांचा समावेश असणारी अनेक फीचर्स पाहायला मिळतील.

थॉमसन अल्फा 32 इंच एचडी रेडी एलईडी स्मार्ट लिनक्स टीव्ही 30 डब्ल्यू साउंड आउटपुट आणि बेझल-लेस डिझाइन (32अल्फा007BL)

किमतीबद्दल बोलायचे झाले तर थॉमसनच्या अल्फा स्मार्ट एलईडी टीव्हीची मूळ किंमत 14999 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टकडून त्याच्या खरेदीवर सवलत देण्यात येत आहे. या मोठ्या सवलतीनंतर, तुम्हाला हा टीव्ही 9990 रुपयात खरेदी करता येईल. या LED टीव्हीची खासियत म्हणजे त्याचा डिस्प्लेचा आकार. वायफायसह फ्रेमलेस डिस्प्ले मिळत आहे

KODAK 7XPRO सीरिज 32 इंच HD रेडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही

फ्लिपकार्टवर आता या स्मार्ट एलईडी टीव्हीची किंमत 10,999 असली तरी तुम्हाला या एलईडी टीव्हीच्या खरेदीवर खूप मोठी सवलत मिळेल. त्यानंतर ग्राहकांना हा 32-इंच खरेदी करण्यासाठी केवळ 9990 रुपये मोजावे लागणार आहेत.

या किमतीत स्मार्ट एलईडी टीव्ही खरेदी केल्याने तुम्ही हजारोंची बचत करू शकता. या एलईडी टीव्हीमध्ये, ग्राहकांना 24 वॅट स्पीकर मिळत असून जे पुढील स्तराची ऑडिओ गुणवत्ता प्रदान करतात. तसेच यात उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी एक कोल्ड कोर प्रोसेसर देण्यात येत आहे.