Smart TV : घरबसल्या थिएटरचा आनंद घेण्यासाठी आजच आणा Thomson QLED 4K TV, अगदी तुमच्या बजेटमध्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Smart TV : फ्रेंच कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड थॉमसनने भारतात सणासुदीच्या आधी नवीन स्मार्ट टीव्ही लॉन्च केले आहेत. कंपनीने काल म्हणजेच 8 सप्टेंबर रोजी Google TV सह QLED मालिका टीव्ही सादर केला आहे. ज्यामध्ये 50 इंच, 55 इंच आणि सर्वात मोठे 65 इंच थॉमसन QLED स्मार्ट टीव्ही लाँच करण्यात आले आहेत.

या ब्रँडने 4K टीव्हीच्या किंमतीत QLED टीव्ही बाजारात लॉन्च केला आहे. विशेष बाब म्हणजे नवीन स्मार्ट टीव्ही अतिशय कमी किमतीत उत्तम फीचर्ससह लॉन्च करण्यात आले आहेत. जर आपण 55 इंच मॉडेल बघितले तर त्याला 33,999 रुपयांना एंट्री मिळाली आहे.

तर 55 इंच मॉडेल 40,999 रुपयांना आणि 65 इंच मॉडेल 59,999 रुपयांना बाजारात दाखल झाले आहे. हे थॉमसन टीव्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर बिग बिलियन डेज सेलमध्ये ‘बिग बिलियन डेज स्पेशल’ म्हणून विकले जातील. टीव्हीच्या फीचर्सची माहिती पुढीलप्रमाणे…

माहितीसाठी, थॉमसन ब्रँडची परवानाधारक कंपनी, SPPL, मेक इन इंडिया व्हिजनला पुढे घेऊन Google परवानाधारक QLED टीव्ही तयार करणारी पहिली भारतीय उत्पादक बनली आहे.

थॉमसन QLED स्मार्ट टीव्हीची वैशिष्ट्ये

हे नवीन QLED टीव्ही पूर्णपणे फ्रेमलेस आहेत आणि डॉल्बी व्हिजन HDR10, डॉल्बी अॅटमॉस, डॉल्बी डिजिटल प्लस, डीटीएस ट्रूसराऊंड, बेझल-लेस डिझाइनसह येतात. चांगल्या ऑडिओसाठी, 40W डॉल्बी ऑडिओ स्टिरिओ बॉक्स स्पीकर उपलब्ध आहे. स्टोरेजच्या बाबतीत 2 जीबी रॅम, 16 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले आहे. यासोबतच ड्युअल बँड (2.4 5) GHz Wi-Fi आणि Google TV यासह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

थॉमसन QLED स्मार्ट टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, हॉटस्टार, ZEE5, ऍपल टीव्ही, वूट, सोनी लिव्ह आणि गुगल प्ले स्टोअरवरील 10000 हून अधिक अॅप्स आणि गेम्स आणि 500,000 हून अधिक टीव्ही शोला सपोर्ट करतो. कलर ऑप्शन्सबद्दल बोलायचे झाले तर थॉमसन क्यूएलईडी सीरीजचे नवीन टीव्ही फक्त काळ्या रंगात विकले जातील.