Whatsapp Tricks: तुम्हाला माहिती आहे का व्हाट्सअप वरील मेसेज वाचल्यानंतर ब्लू टिक्स कशी बंद करतात? ही पद्धत वापरा आणि ब्लू टिक्स बंद करा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Whatsapp Tricks:- आजकाल अनेक जण सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करतात व या सोशल मीडियाचा विचार केला तर यामध्ये फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअपचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या मदतीने आपण चॅटिंग, संदेश पाठवणे, व्हिडिओ पाठवणे यासारख्या अनेक गोष्टी अगदी आरामात करू शकतो.

या पद्धतीने जर आपण व्हाट्सअपचा विचार केला तर व्हाट्सअपचा वापर हा मोठ्या प्रमाणावर केला जातो. व्हाट्सअप या सोशल मीडिया प्लेटफॉर्मच्या माध्यमातून आपण अनेक प्रकारचे मेसेज इतरांना पाठवत असतो.

यावेळी आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण एखाद्याला मेसेज पाठवतो आणि समोरच्याने तो पाहिला आहे की नाही हे व्हाट्सअपच्या ब्लू टिक्सच्या मदतीने आपल्याला समजत असते. परंतु यामुळे बऱ्याचदा आपण मेसेज वाचतो

परंतु कामाच्या घाईगडबडीत जर आपण रिप्लाय दिला नाही तर समोरच्याला कदाचित वाटू शकते की आपण समोरच्याकडे दुर्लक्ष केले व यामुळे अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला जर वाटत असेल आपल्याला व्हाट्सअप वरील मेसेज वाचता

तर यायला पाहिजे परंतु ब्लू टिक्स समोरच्या व्यक्तीला दिसायला नको तर त्या बंद देखील करता येतात. यासाठी एक साधी आणि सोपी पद्धत आहे व त्या आधारे तुम्ही या टिक्स बंद करू शकता.

 ही पद्धत वापरा आणि व्हाट्सअप वर असणारी ब्लू टिक्स बंद करा

 याकरिता तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मधील व्हाट्सअप चालू करणे गरजेचे आहे. व्हाट्सअप चालू केल्यानंतर कोपऱ्यामध्ये आपल्याला तीन डॉट्स दिसतात व या तीन डॉट्सवर क्लिक करावे व सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसी हा पर्याय तुम्हाला दिसेल व या पर्यायावर क्लिक करावे.

त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला रीड रिसिपट्स(read receipts) असा एक पर्याय दिसतो व त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही तुमची ब्लू टिक्स म्हणजेच read receipts पर्याय बंद करू शकतात. विशेष म्हणजे तुम्हाला चालू करायचा असेल तर तुम्ही त्याला पुन्हा सुरू देखील करू शकतात.

 दुसऱ्या काही साध्या आणि सोप्या पद्धती

 नोटिफिकेशन रीड करून- तुम्हाला माहित आहे की जेव्हा आपल्याला व्हाट्सअप वर कुठलेही मेसेज येतात तेव्हा मोबाईलच्या स्क्रीनवर त्याच्या नोटिफिकेशन आपल्याला येत असतात.

त्यामुळे असे व्हाट्सअप वर आलेले मेसेज तुम्ही व्हाट्सअप वर जाऊन न वाचता त्या नोटिफिकेशन मधून वाचले तरी समोरच्या व्यक्तीला वाचल्याच्या या ब्लू टिक्स दिसत नाहीत.

 एरोप्लेन मोडचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल एरोप्लेन मोडवर लावू शकतात व व्हाट्सअप वर आलेले मेसेज वाचू शकतात. तुमचा मोबाईल एरोप्लेन मोड वर असेल

व तुम्ही मेसेज जरी वाचला असेल तरी समोरच्याला ते समजत नाही. परंतु यामध्ये जेव्हा तुम्ही एरोप्लेन मोड बंद करता तेव्हा मात्र चॅटमध्ये तुम्हाला ब्लू टिक्स दिसतात.