Xiaomi 13T : ओप्पो, सॅमसंगला टक्कर देण्यासाठी येत आहेत Xiaomi चे दोन शक्तिशाली स्मार्टफोन, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Xiaomi 13T : जर तुम्ही एखादा दमदार फीचर्ससह कमीत कमी किंमतीतील स्मार्टफोन घेण्याच्या विचारात असाल तर थोडं थांबा. कारण आता भारतीय मार्केटमध्ये लवकरच एकापेक्षा एक शक्तिशाली स्मार्टफोन्स लाँच केले जाणार आहेत.

आता Xiaomi आपले दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. यात जबरदस्त फीचर्स दिले जाणार आहेत. तो ओप्पो, सॅमसंग यांसारख्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देऊ शकतो तसेच यात Leica चा क्वाड कॅमेरा सेटअप या फोनसोबत उपलब्ध असेल.

जाणून घ्या किंमत

Tipster SnoopyTech कडून ट्विटरवर Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन उघड करण्यात आले आहे. यात टिपस्टरने असे सांगितले की हे दोन्ही फोन 1 सप्टेंबर रोजी लॉन्च करण्यात येणार आहेत. किमतीचा विचार केला तर कंपनीच्या Xiaomi 13T Pro ची किंमत EUR 799 (अंदाजे रु. 71,000) तर Xiaomi 13T ची किंमत EUR 599 (अंदाजे रु. 53,000) असणार आहे.

जाणून घ्या Xiaomi 13T आणि 13T Pro फीचर्स

फीचर्सचा विचार केला तर Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro हे दोन्ही फोन MIUI 14 आउट-ऑफ-द-बॉक्स वर चालू शकतील. यात 144Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले असेल तर Xiaomi 13T ला “फ्लॅगशिप 4nm प्रोसेसर” द्वारे समर्थित असू शकतो. जो Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असू शकतो. Xiaomi 13T Pro मध्ये “4nm प्रोसेसर” येऊ शकतो जो MediaTek Dimensity 9200 चिपसेट असू शकतो.

Leica चा क्वाड कॅमेरा सेटअप या फोनसोबत उपलब्ध असेल. परंतु त्यात सेन्सर तपशील उपलब्ध केले नाहीत. स्टोरेजचा विचार केला तर Xiaomi 13T 8GB 256GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो, तर Xiaomi 13T Pro 12GB 256GB स्टोरेज येईल. या दोन्हींवर 5000mAh बॅटरी पॅक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पूर्वीचे 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतील, तर प्रो मॉडेलला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. दरम्यान असे म्हटले जात आहे की ते बॉक्समध्ये सपोर्टेड चार्जरसह येतील.