Monsoon News: राज्यातील काही भागाला हवामान खात्याचा ऑरेंज तर काही भागाला यलो अलर्ट जारी, वाचा तुमच्या जिल्ह्यातील पाऊसमान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Monsoon News:-  सध्या महाराष्ट्रातील पावसाची स्थिती पाहिली तर कुठे रिमझिम तर कुठे उघडीप अशी स्थिती आहे. पेरण्या झाल्यानंतर पिकांना जोरदार पावसाची प्रतीक्षा असून त्यामानाने मात्र राज्यात पाऊस पडताना दिसत नाहीये. महाराष्ट्र मध्ये पुन्हा एकदा जोरदार पाऊस सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे पाहायला गेले तर यावर्षी पावसाची सुरुवात काहीशी निराशा जनक झाली.

यामध्ये चक्रीवादळाचा प्रभाव तर राहिलाच परंतु काही प्रमाणात एल निनो चा प्रभाव देखील या कमी पावसामध्ये असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. परंतु सध्या जोरदार पावसाची आतुरतेने वाट पाहत असलेल्या बळीराजासाठी एक आनंदाची आणि दिलासा देईल अशी अपडेट समोर येत आहे.

 पुढील पाच दिवस पावसाचा अंदाज

याबाबत भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येणाऱ्या पुढील पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून आज मुंबई तसेच उत्तर कोकणातील ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. एवढेच नाही तर रायगड आणि रत्नागिरी मध्ये देखील 21 जुलै पर्यंत पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे.

तसेच पालघर आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येणारे तीन दिवसात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. असेच पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर या ठिकाणी पुणे तसेच सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसरात येणाऱ्या काही दिवसात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला असून येत्या शुक्रवार पर्यंत पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाट परिसरामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

तसेच विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

मराठवाड्यामध्ये अजूनही चांगला पाऊस न झाल्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असून दुबार पेरणीचे संकट कोसळणार नाही ना या चिंतेत शेतकरी आहेत. त्यामुळे मराठवाड्यामध्ये चांगल्या पावसाची आवश्यकता असून सध्या तरी या भागामध्ये चांगला पाऊस होणार नाही अशा प्रकारचा अंदाज असल्यामुळे शेतकऱ्यांना अजून देखील चांगल्या पावसाची प्रतीक्षाच करावी लागण्याची शक्यता आहे.