नगरमधील शिंदेशाही धोक्यात, गड येईल पण सिंह जाईल?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत – जामखेडजिल्ह्यात युतीचे भाजपाचे वारे जोरात आहेत. येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे.

ना. राम शिंदे यांचे पाच वर्षातील अपयश तसेच धनगर समाजाचा भ्रमनिरास, शेतकऱ्यांची नाराजी आणि मराठा कार्ड हे रोहित पवारांसाठी फायद्याचे ठरणार असल्याचे बोलले जात आहे. रोहित पवारांचा हायप्रोफाईल प्रचार राम शिंदेना धोक्याची घंटा ठरत आहे.

मराठा मोर्चाचीही सुरूवात नगर जिल्ह्यातून झाली असल्याने मराठा कार्ड या क्षेत्रात जरा सरसचं ठरत असल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात युतीचे अर्थात भाजपाचे वारे जोरात आहेत, येथे विखेंनी १२ – ० ची वल्गनाही केली आहे. मात्र, त्यात काही प्रमाणात यश आले तरी सध्याच्या परिस्थितीतून कर्जत – जामखेडची जागा धोक्यात असल्याने नगरमध्ये गड आला पण सिंह गेला, अशी अवस्था होते की काय? अशी भिती आता भाजपातूनच व्यक्त केली जात आहे.

दरम्यान , कर्जत – जामखेडमध्ये भाजपाचे विद्यमान मंत्री ना. राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे निवडणूक लढवत आहे. ही लढत राज्याचे लक्ष वेधून घेणारी आहे. येथे भाजपाच्या ना. शिंदेसाठी खा. डॉ . सुजय विखे तळ ठोकून आहेत, तर रोहित पवारांनीही मोठी मोर्चेबांधणी केल्याचे पहायला मिळालेले आहे. वास्तविकता, या मतदार संघात ना. शिंदे यांनी पाच वर्षात जलसंधारणाची मोठी कामे केल्याने टँकर संख्या कमी झाल्याचे चित्र आहे. 

मात्र, अन्य प्रश्नांकडे जसे, एमआयडीसी असेल किंवा रस्ते, शेतीपाणी अशा प्रश्नांना हात घालून भाजपाला लक्ष्य केले आहे. या मतदार संघात भाजपाला आणि ना. शिंदेंना मानणारे कार्यकर्त्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे हा मतदार संघ भाजपाचा गड समजला जातो आणि आज या गडावरील ना. शिंदे हे भाजपाचे नेतृत्व करणारे सिंह आहेत. 

येथे ना. शिंदेंना अनुकूल वातावरण आहे. मात्र, मतपेटीतून धनगर आरक्षणाचा प्रश्न अनुत्तरीत राहिल्याने येथे नाराजीचा फटका बसू शकतो. याशिवाय मराठा आरक्षण जरी भाजपा सरकारने दिले असले तरी एक मराठा उमेदवार म्हणून वारं फिरलं तर रोहीत पवारांसाठी ते फायदेशीर ते ना. शिंदेंची ती डोकेदुखी ठरणारे आहे. त्यात कांदा उत्पादकांची नाराजी, बेरोजगार तरूणांचा संताप, असुरक्षित महिलांचा राग याची भर पडू शकते. तसेच पवारांनी दुष्काळात टँकरने दिलेला दिलासा, रोजगार मेळावे, आरोग्य शिबीर हे देखील पवारांची मुलभूत बलस्थाने समजली जात आहे. 

आता पवार त्यामुळे ना. शिंदे यांच्यासमोर मोठे आव्हान घेवून उभे आहेत. या सर्व आव्हानांवर मात करून विजय मिळवण्यासाठी त्यांना मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. अर्थात, त्यासाठी भाजपाचे मराठा नेते छत्रपती उदयनराजे यांची सभा घेतली जाणार आहे, तसेच वंजारी समाजाचे मते मिळविण्यासाी ना. पंकजा मुंडे या देखील कर्जत – जामखेडमध्ये येणार असल्याने ही लढत निश्चितच रंगतदार होणार आहे.

Leave a Comment