या मतदारसंघात उमेदवार प्रतिनिधीविनाच मतपेट्या सील…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर उमेदवारांचे प्रतिनिधी हजर नसताना नगर शहर मतदारसंघातील मतपेट्या व स्ट्राँगरुम सील केले.

त्यामुळे याबाबत प्रशासनाने योग्य तो खुलासा करावा.अशी मागणी शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांचे प्रतिनिधी गिरीष जाधव यांनी केली आहे.

यासंदर्भात जाधव यांनी नगर शहर मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,सोमवारी मतदानानंतर मतपेट्या स्ट्राँगरुममध्ये सील करण्यासाठी संध्याकाळी ८.३० वा. पासून प्रशासनाने वेगवेगळी वेळ दिल्याने आम्हाला तेथे हजर राहण्यासाठी नेमकी वेळ दिली नाही.

आम्ही रात्री ११.३० वा. निवडणूक अधिकारी अर्जुन श्रीनिवास यांना भेटलो असता ४.३० वा. कलेक्टर येणार आहेत.तेव्हा आपण सील करू त्यावेळी तुम्हाला बोलावले जाईल असे सांगितले.

त्यानंतर मंगळवारी (दि.२२) सकाळी सहायक निवडणूक अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता आम्ही पहाटे स्ट्राँगरुम व मतपेट्या सील केल्याचे त्यांनी सांगितले. तरी याबाबत योग्य तो खुलासा करावा अशी मागणी केली आहे. 

Leave a Comment