शेअर बाजाराने गाठला नवा उच्चांक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई : अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापार करार अंतिम टप्प्यात असल्याने जागतिक बाजारांत उत्साह निर्माण झाला आहे. परिणामी, जगभरातील भांडवली बाजारात मोठी तेजी दिसून येत आहे.

त्याचबरोबर आगामी पतधोरणाचा आढावा घेताना भारतीय रिझर्व्ह बँक पुन्हा व्याजदरात कपात करण्याची आशा वर्तिाली जात असल्याने त्याचे पडसाद सोमवारी भारतीय बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने जोरदार उसळी घेत नवा उच्चांक गाठला.

सेन्सक्सने ५३० अंकांनी वधारत ४०,८८९ वर पोहचला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५९ अंकांनी वाढ नोंदवत १२,०७३ वर स्थिरावला.

अमेरिका आणि चीनदरम्यानचा व्यापार करार पुढील महिन्यात अंतिम रुपात येणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.

त्याचबरोबर देशांतर्गत घडामोडीमुळे देखील बाजाराला बळकटी मिळाली आहे. महसुलात येत असलेली तूट भरून काढण्याबरोबर त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकारकडून मोठे पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँक पतधोरणाचा आढावा घेताना अर्थव्यवस्थेला चालना देण्याकरिता पुन्हा व्याजदरात कपात करण्याची शक्यता आहे. त्याचाही परिणाम बाजारात जाणवत आहे. परिणामी, गुंतवणूकदारांमध्ये आर्थिक स्थिती सुधारणा असल्याचा विश्वास आल्याने आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सर्वच क्षेत्रातील कंपन्याच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने नवा उच्चांक गाठल्याने बाजारात उत्साही वातावरण पसरले आहे. दिवसभरातील चढ-उतारात भांडवली बाजारात सर्वाधिक नफा भारती एअरटेलच्या समभागांना मिळाला. कंपनीचे शेअर सुमारे ७.२० टक्क्यांनी वधारले.

त्यापाठोपाठ टाटा स्टीलचे ४.९९ टक्के, इंड्सइंड बँकेचे ३.४९ टक्के, ॲक्सिस बँकेचे ३.२६ टक्क्यांनी, तर वेदांता लि.चे २.५७ टक्क्यांनी वाढ नोंदवली. ओएनजीसी तसेच येस बँकेचे समभाग वगळता दिवसभर सर्वच क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स वधारले.

Leave a Comment