सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले – माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- शेतक-यांचा सातबारा कोरा करणार असे आश्‍वासन देणा-यांनीच कर्जमाफी योजनेत जाचक नियम आणि अटी टाकुन शेतक-यांना चिंताग्रस्‍त बनविले आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेतक-यांना २५ हजार रुपये देण्‍याची घोषणाही मुख्‍यमंत्री विसरुन गेले आहेत. मंत्र्यांचे खातेवाटप, बंगले वाटप आणि आता पालकमंत्री पदावरुन सुरु झालेले वाद संपल्‍यानंतरच यांना शेतक-यांची आठवण होईल, वेळ पडली तर आघाडी सरकारला मुक्‍ती मिळेल पण यांच्‍यावादात शेतकरी कर्जमुक्‍त होणार नाही असा खोचक टोला माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महाविकास आघाडीला लगावला.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

तालुक्‍यातील वाकडी येथे सुमारे ३ कोटी ५७ लाख रुपयांच्‍या विकास कामांचा भुमिपुजन व उद्घाटन समारंभ आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या शुभहस्‍ते करण्‍यात आला. जेष्‍ठ कार्यकर्ते सदाशिव बधे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास सभापती हिराबाई कातोरे, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, चेअरमन मुकूंदराव सदाफळ,व्‍हा.चेअरमन प्रतापराव जगताप, जि.प सदस्‍या कविता लहारे, पं.स सदस्‍या अर्चनाताई आहेर, सरपच धनंजय धनवटे, वाकडीचे सरपंच डॉ.संपतराव शेळके, राजेंद्र लहारे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस.आर वर्पे आदि मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.

हे पण वाचा :- कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नगर मध्ये येत शंकरराव गडाख यांनी केले हे काम !

राज्‍यात ३०० शेतक-यांनी आत्‍महत्‍या केल्या आहेत. यातील सर्वाधिक संख्‍या ही मराठवाड्यातील शेतक-यांची आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्‍या शेतक-यांच्‍या या आत्‍महत्‍या आहेत याकडे लक्ष वेधुन आ.विखे पाटील म्‍हणाले की, सत्‍ता नाट्याच्‍या खेळात महाविकास आघाडीचे नेते शेतक-यांना विसरले आहेत. सत्‍तेवर येण्‍यापुर्वी आम्‍ही सातबारा कोरा करणार, अवकाळीग्रस्‍त शेतक-यांना २५ हजार रुपये देणार अशा घोषणा मुख्‍यमंत्री उध्‍दव ठाकरे यांनी केल्‍या होत्‍या पण त्‍याचा विसर त्‍यांना पडला आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा त्‍यांनी केली. या योजनेची परिपत्रक पाहुन शेतकरी आता अधीक चिंताग्रस्‍त झाला आहे. जाचक नियम आणि अटींमध्‍ये ही योजना सरकारने अड‍कविल्‍यामुळे सरकारच्‍या कर्जमाफी योजनेचा लाभ कीती शेतक-यांना मिळेल असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला.

हे पण वाचा :- नगरच्या युवक- युवतींना चिंता फक्त जोडीदाराची,करिअरपेक्षा रिलेशनशीपला अधिक महत्व 

महाआघाडी सरकार सत्‍तेत आल्‍यानंतर मंत्र्यांच्‍या खाते वाटपावरुन वाद सुरु झाले. आता कोणी कोणता बंगला द्यायचा यामध्‍ये सरकार दंग आहे. कालपासुन कोणी कोणत्‍या जिल्‍ह्याचे पालकमंत्री व्‍हायचे याची स्‍पर्धा लागली आहे. हा सर्व प्रकार राज्‍याच्‍या हिताचा नाही. राज्‍यातील एकुणच गोंधळलेली परिस्थिती पाहाता सामान्‍य माणसाला न्‍याय मिळेल असे वातावरण नाही. सरकार आघाडीचे असले तरी आपल्‍या मतदार संघात विकास कामांमध्‍ये कोणतीही अडचण येणार नाही.

हे पण वाचा :- अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड टाकून तरुणाचा खून

यापुर्वीही विकास कामांचा निधी आपण आणण्‍यात कमी पडलो नाही. निळवंडे धरणाच्‍या कालव्‍यांतील कामांची अडचण दुर झाल्‍याने दिड वर्षात पाणी देण्‍याचा आपला शब्‍द होता. पण या आघाडी सरकारच्‍या धोरणांमुळे यात आडकाठी येती की काय अशी भिती त्‍यांनी व्‍यक्‍त केली. वा‍कडी येथील साठवन तलाव, गोदावरी कालवा नुकनीकरण या कामांना आपले प्राधान्‍य देणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. या प्रसंगी वाकडी ग्रामस्‍थांच्‍यावतीने आ.विखे पाटील यांचा सत्‍कार करण्‍यात आला. सरपंच डॉ.संपतराव शेळके, राजेंद्र लहारे यांची याप्रसंगी भाषणे झाली.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment