अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये ट्रकने महिलेला चिरडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :-  अहमदनगर शहरातील केडगाव मध्ये ट्रकच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

ट्रकच्या धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाला असून तिच्याबरोबर असलेली दुसरी महिला गंभीर जखमी झाली आहे..शांताबाई काळे असे या मृत महिलेचे नाव आहे. 

केडगाव येथे भूषणनगर परिसरात ट्रकने महिलेला चिरडले. शांताबाई काळे या महिलेचा यात मृत्यू झाला अपघातानंतर चालक ट्रकसह पसार झाला आहे.

शांताबाई आणि त्यांच्याबरोबर असलेली जखमी महिला या रस्त्याकडेला उभ्या होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली.शांताबाई हा ट्रक खाली सापडल्या. त्यात त्या चिरडल्या गेल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शांताबाई त्यांच्याबरोबर असलेली दुसरी महिला ही गंभीर जखमी झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरले. नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते.

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment