वाळू तस्करीतूनच झाला शिवसैनिक सुरेश गिर्हे यांचा गोळ्या घालून खून !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- शिवसेनेचे सुरेश श्यामराव गिऱ्हे याच्या निर्घृण हत्त्येप्रकरणी पोलिसांनी संवत्सर रामवाडी येथील संशयित आरोपी रवी अप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यासह सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सुरेश गिऱ्हे याच्या विरुद्ध शिर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या गुन्ह्यासह वाळूचोरी, जुगार असे १० गुन्हे दाखल असून त्यात खंडणी, लुटमार, वाळूचोरी आदी गुन्हे आहेत.

त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले होते. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुले असा परिवार आहे. शवविच्छेदन प्रवरा ग्रामीण रुग्णालयात केल्यानंतर तीन गोळ्या शरीरातून काढण्यात आल्या.

दरम्यान, मृताचे वडील श्यामराव भीमराव गिऱ्हे (वय ६१) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात रवी अप्पासाहेब शेटे व विजय खर्डे यांच्यासह अन्य चार अनोळखी आरोपींविरुद्ध फिर्याद दिली.

सहा वर्षांपूर्वी संवत्सर ग्रामपंचायत हद्दीत संवत्सर चौफुलीवर वाळूचोरांच्या दोन टोळ्यांत मारामारी झाली होती. २०१२ मध्ये बंटी शिनगर याच्या हत्येत संवत्सर येथील रवी अप्पासाहेब शेटे हा एक आरोपी आहे. त्याचा या हत्येशी संबंध असल्याचे बोलले जात आहे.

या घटनेतील काही आरोपींना दहा वर्षांची शिक्षा झाली होती, तर काही आरोपी फरार झाले होते. फरार आरोपींत रवी शेटे याचे नाव असल्याचे कळते. तो अनेक गुन्ह्यांत पोलिसांना हवा होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

त्याला हद्दपारही करण्यात आले होते. त्याचे व व भोजडे येथील हत्या झालेला सुरेश गिऱ्हे याचे वाळू व्यवसायातून बिनसले होते. ते एकमेकांच्या जीवावर उठले होते. ते एकमेकाला पाण्यात पहात असत. 

रवी शेटे हा अनेक दिवसांपासून सुरेश गिऱ्हे याच्या मागावर होता. रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास तो घरी आला असताना त्याच्या पाळतीवर असलेल्या काही गुन्हेगारांनी त्यास चहा पितानाच त्याच्या भोजडे चौकी येथील घरी गाठले.

त्याने आरोपींना ओळखले. जीव वाचवण्यासाठी तो घराशेजारच्या मक्याच्या पिकात पळत असताना हल्लेखोरांनी त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. काही हल्लेखोरांनी तलवारीने छातीवर वार करून त्यास जागीच ठार केले, अशी माहिती तालुका पोलिसांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

Leave a Comment