आता बातम्याच द्यायच्या नाहीत का? बातमी दिली म्हणून अहमदनगर जिल्ह्यात पत्रकारावर हल्ला

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बातम्या देणेही आता पत्रकारांना अडचणीचे ठरू लागले आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून पत्रकार गावात, शहरात फिरून बातम्या देत आहेत.

नागरिकांकडून कौतूक दूरच त्यांच्या रोषालाच सामोरे जावे लागत आहे. नगर जिल्ह्यात पानेगाव (ता.नेवासे) येथील १७ कुटुंबांना क्वारंटाइन केल्याची बातमी गावातील पत्रकार बाळासाहेब नवगिरी यांनी दिली होती.

बातमी दिल्याच्या रागातून जमावबंदीचा आदेश मोडत गावातील दिडशे ते दोनशे जणांनी एकत्र येत पत्रकार नवगिरे यांच्या घरावर मोर्चा काढला. त्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली.

धमकावण्यात आले. हा पत्रकारितेवरील हल्ला तर आहेच. शिवाय सध्याच्या परिस्थितीत जमावबंदी आणि सामाजिक अंतर ठेवण्याच्या नियमाचाही भंग आहे.

अवैद्य धंद्याच्या बातम्या दिल्याचा राग धरुन शंभर ते दिडशे जणांनी घरावर हल्ला करत मारहाण करुन धमकी दिल्याची फिर्याद बाळासाहेब भाऊसाहेब नवगिरे यांनी दिली आहे.

क्वारंटाइन असताना घराबाहेर पडून जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी आण्णासाहेब उर्फ शिनाना गायकवाड, मीरा शेंडगे, शोभा पवार, रमेश वाघमारे, संतोष अढागळे, विजय वाघुले, आबासाहेब वाघुले,रामू किसन गायकवाड,भिमा शेंडगे व अंजली गुलाब गायकवाड आदीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment