अहमदनगर ब्रेकिंग : बिअरबारचा मालक बेपत्ता,वेगवेगळ्या चर्चेला उधान….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर – राहुरी तालुक्‍यातील उंबरे येथील हॉटेल नटराज बियर बार ‘चा मालक दि.१७ एप्रिल रोजी दुपार पासुन अचानक रहस्यमय गायब झाल्याची घटना घडली असुन याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली आहे.

संतोश रघुनाथ ढोकणे वय वर्ष ३२ राहणार उंबरे हा तरुण दि.१७ रोजी दुपारी जेवन झाल्या नंतर काळी दुचाकी पल्सर घेवुन गेला मी परत येतो असे म्हणुन तो अद्याप परत आला नाही.

याबाबत राहुरी पोलिस ठाण्यात मिसिंगची खबर देण्यात आली आहे. संतोश ढोकणे हा उंबरे गावात हॉटेल बियर चालवतो संतोष हा अचानक रहस्यमय गायब झाल्याने ग्रामस्थांमधे वेगवेगळ्या चर्चेला उधान आले आहे. पोलीस बेपत्ता हॉटेल चालक ढोकणेचा शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

Leave a Comment