दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून महिलांनी केली ‘त्या’ महिलेस बेदम मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पारनेर :- अवैध दारू व्यवसायाची माहिती दिल्याच्या रागातून तीन महिलांनी एका महिलेस बेदम मारहाण केली. मारहाणीची तक्रार देण्यासाठी निघालेल्या महिलेचा विनयभंगही करण्यात आला. ही घटना देवीभोयरे येथे घडली. महिलेच्या फिर्यादीवरून तीन महिलांसह मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून विनयभंग करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.

देवीभोयरे येथील कौलवस्तीवर एक महिला अवैध व्यवसाय करत असल्याची माहिती पीडित महिलेने कार्यकर्ते बबनराव कवाद यांना दिली होती. कवाद यांनी कॉन्स्टेबल दत्ता चौगुले यांना कळवल्यानंतर या अवैध दारू व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

पीडित महिलेच्या पतीने अवैध दारूविक्रीची माहिती पोलिसांना दिल्याचा संशय दारू विक्री करणाऱ्या महिलेला व तिच्या कुटुंबीयांना होता. पीडित महिला सायंकाळी सहाच्या सुमारास शेतामध्ये गवत काढत असupdaताना दारू विक्री करणारी महिला व तिच्या दोघी मुली हातात काठ्या घेऊन तेथे आल्या.

तुझा नवरा कोठे लपून बसला आहे, आमच्या दारू व्यवसायाची माहिती तो पोलिसांना देतो, तो माजला आहे असे सांगत तिघीही शिवीगाळ करू लागल्या. ते एकून शेजारच्या शेतात असलेले पीडितेचे पती तेथे आले असता तिघींनी त्यांच्या शर्टची कॉलर धरून जाब विचारण्यास प्रारंभ केला.

पतीस सोडवण्यासाठी महिला पुढे गेेली असता तिघींनी तिला काठ्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर पीडित महिला पतीसह पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी निघाली असता तिघींनी त्यांना पुन्हा अडवले. त्यांनी दारूविक्री करणाऱ्या महिलेच्या मुलास बोलवून घेतले असता खोरे हातात घेऊन शिवीगाळ करत तो आला.

दोघांनाही मारहाण करण्यास सुरूवात करत मोबाइल भिंतीवर आपटून फोडला. पीडित महिलेचा विनयभंग करून माझ्याविरोधात तक्रार दाखल केली, तर तुला सोडणार नाही, अशी दमबाजी केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

Leave a Comment