महाराष्ट्र सायबर विभाग : लॉकडाऊनच्या काळात ३३३ गुन्हे दाखल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मुंबई, दि. ३० – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली असून राज्यात आतापर्यंत ३३३ गुन्हे दाखल केले आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाने दिली.

टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारासंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये ज्या ३३३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, त्यापैकी १३ गुन्हे अदखलपात्र (N.C)आहेत.

जिल्हानिहाय गुन्हे

बीड – २९, पुणे ग्रामीण – २७, जळगाव – २६, मुंबई – २०, कोल्हापूर -१६, सांगली -१२, नाशिक ग्रामीण – १२, नाशिक शहर – ११, जालना – ११, सातारा – १०, बुलढाणा – १०, लातूर – १०, नांदेड – ९, पालघर – ९, ठाणे शहर – ८,परभणी – ८, सिंधुदुर्ग –

७, नवी मुंबई – ७, अमरावती – ७, ठाणे ग्रामीण – ७, हिंगोली – ६, नागपूर शहर – ६, गोंदिया – ५, सोलापूर ग्रामीण – ५, पुणे शहर – ४, रत्नागिरी – ४ ,सोलापूर शहर – ४, नागपूर ग्रामीण – ४, भंडारा – ३, चंद्रपूर – ३, पिंपरी- चिंचवड – ३,रायगड – २, धुळे – २, वाशिम – २, औरंगाबाद -१ (एन.सी), यवतमाळ -१ यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

या गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले, आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १३८ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी १२५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,

टिकटॉक विडिओ शेअर प्रकरणी १० गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ६ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत.

तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, युट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४९ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत १५२ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी ६० आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

नागपूर ग्रामीण

नागपूर ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे, त्यामुळे नागपूर ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या ४ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी क्र.१ याने फिर्यादी हा कोरोना महामारीच्या काळात हरवला आहे,

अशा आशयाचा मजकूर आपल्या फेसबुक प्रोफाईल वर टाकला होता. तर आरोपी क्र २ याने तोच मजकूर असणारी पोस्ट व फिर्यादीचा फोटो जोडून सदर पोस्ट विविध व्हाट्सअँप ग्रुपवर पोस्ट केली होती.

पुणे ग्रामीण

पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद झाली आहे, त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील नोंद केलेल्या गुन्ह्यांची संख्या २७ वर गेली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी महिलेने आपल्या फेसबुक पोस्टवर कोरोना महामारीबाबत चुकीची माहिती असणारी व अफवा पसरविणारी पोस्ट शेअर केली होती.

त्यामुळे कोरोना महामारीच्या सरकारी उपाययोजनांबाबत स्थनिक लोकांमध्ये द्वेष पसरून, परिसरातील शांतता बिघडून ,कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असता.

वेबसाईटची खातरजमा करावी

सध्या लॉकडाऊनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे व नागरिक ऑनलाईन शॉपिंग करत असल्यामुळे, इंटरनेटवर अनेक संकेतस्थळ (website) सुरु झाल्या आहेत ज्या आपण परदेशातील महागड्या ब्रँड्सचे वितरक आहोत अशा आशयाचा दावा आपल्या संकेतस्थळावर (website)जाहीरपणे करतात.

महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने आवाहन करण्यात येते की, अशा लिंक्सवरून काही खरेदी करताना सावध रहा, सायबर भामट्यांनी फसविण्यासाठी तयार केलेली ती नकली (fake) वेबसाईटसुद्धा असू शकते.

कृपया अशी एखादी वेबसाईट तुमच्या पाहण्यात आली तर आधी खातरजमा करून घ्या. मगच त्यावर ऑनलाईन खरेदी करा व कुठेही आपल्या बँक खात्याची सर्व माहिती तसेच डेबिट/ क्रेडिट कार्ड पिन नंबर देऊ नका.

सर्व नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. असे आवाहन महाराष्ट्र सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. वि.सं.अ.-डॉ. राजू पाटोदकर

Leave a Comment