लॉकडाऊनच्या काळात सुशिक्षित युवकांना भत्ता मिळावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  संपूर्ण जगामध्ये कोरोना कोविड (१९) च्या पार्श्वभूमीवर उद्योग, व्यवसाय, व्यापार, बाजारपेठ बंद असल्याने कामगार वर्गाच्या हाताला काम राहिले नाही.

काम नाही तर त्यांना वेतनही नाही अशा दुहेरी संकटामुळे युवक वर्ग अडचणीत सापडला आहे. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाकडून बेरोजगार भत्ता मिळावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी निवेदनाद्वारे केली.

सध्याच्या देशासह महाराष्ट्रात कोरोनाशी लढा देत असताना अनेक संकटांचा मुकाबला करावा लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात शहरातून ग्रामीण भागात युवकांचे स्थलांतर झाले आहे.

काही युवकांनी तर बँकांकडून कर्ज घेऊन शहरांमध्ये छोटे मोठे उद्योग चालू केले, परंतु सध्या शहरे बंद असल्याने कर्ज फेडणे कठीण होऊन बसले आहे.

त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे.पुढच्या काळात युवकांना उभारी घेण्यासाठी आर्थिक पाठबळ आवश्यक आहे.

इतर प्रगत देशांप्रमाणे आपल्या राज्यातील युवकांना बेरोजगार भत्ता मिळावा अशी मागणी डॉ.क्षितीज घुले यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.co

Leave a Comment