अहमदनगर ब्रेकिंग : जलाशयात आढळला मृतदेह

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :-  बेपत्ता इसमाचा मृतदेह शेवगाव तालुक्यातील दहिगावने जवळील जायकवाडी जलाशयात सोमवारी आढळला.

शिरसगाव येथील रोहिदास कान्हू भगत असे मृत व्यक्तीचे नाव आहे. 

रोहिदास भगत हे १५ मे पासून घरुन बेपत्ता झाले होते. ते बेपत्ता झाल्याची तक्रार शेवगाव पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली होती .

सोमवारी घेवरी शिवारातील जायकवाडी जलाशयात मृतदेह तरंगताना आढळला . स्थानिकांनी पोलिसांना ही माहिती दिली .

याप्रकरणी अकस्मात मृत्युची नोंद करण्यात येऊन शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment