अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ रस्त्याचे नाव ठेवले ‘कोरोना रोड’ !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,19 मे 2020 :- नगर तालुक्यातील मांडवा येथील गावकऱ्यांनी त्यांच्या गावातील रस्त्याचे नाव चक्क ‘कोरोना रोड’ ठेवले आहे. त्याच कारणही तसेच मजेदार आहे.

या रस्त्याचे काम खूप वर्षापासून रखडलेले होते. परंतु नेमके लॉकडाऊनच्या काळातच या कामास मुहूर्त लागला आणि त्या रस्त्याचे काम पूर्ण झाले. त्यामुळे त्यांनी या रस्त्याचे नाव ‘कोरोना’ रोड असे ठेवले आहे.

मांडवा गावापासून जवळच लक्ष्मीवाडी वस्ती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा, यासाठी गावातील काही मंडळी प्रयत्नही करीत होती.

मांडवा गावापासून जवळच लक्ष्मीवाडी वस्ती आहे. या वस्तीवर जाण्यासाठी पक्का रस्ता नव्हता. हा रस्ता लवकरात लवकर तयार व्हावा, यासाठी गावातील काही मंडळी प्रयत्नही करीत होती.

परंतु लॉकडाउनच्या काळात सर्व लोक घरी होते. मोकळा वेळ सत्कारणी लावत हा रस्ता लोकसहभागातून तयार झाला. ‘कोरोना’ काळात हा रस्ता झाल्याची आठवण राहावी,

यासाठी ‘करोना रोड’ नाव ठेवण्याची संकल्पना गावातील एकाने मांडली, व त्यापद्धतीने रस्त्याचे नामकरणही करण्यात आले आहे.या रस्त्यावर तशी पाटी देखील लावण्यात आली आहे.

या निमित्ताने मात्र महाराष्ट्रातील नाही, तर देशातील ‘कोरोना रोड’ असे नाव असणारा एकमेव रोड नगर जिल्ह्यात असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

Leave a Comment