तिखट-मीठ लावलेली कैरी आरोग्यास देते ‘हा’ फायदा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : सध्या बाजारात कैऱ्या येण्याचाच सिझन सुरु आहे. अनेकांना जेवणासोबत कैरी असणे म्हणजे पाची पक्वान्न मिळाल्याचा आनंद असतो. तिखट मीठ लावलेली कैरी आरोग्यास खूप फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला कैरीच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत.

१) तोंड संबंधित आजार बरे होतात –

   तोंडाला दुर्गंधी येत असेल तर कैरी खावी. याशिवाय हिरड्यांमधून रक्त येणं,  दातांच्या इतर समस्यांवरही कैरी फायदेशीर आहे. मजबूत आणि स्वच्छ दात हवेत तर मग कैरीचं सेवन करावं. तोंडाच्या समस्या दूर करण्यासाठी कैरीचं सेवन फायदेशीर ठरतं.

२) डिहाड्रेशनची समस्या दूर होते

   उन्हाळ्यात शरीरातून घामावाटे अनेक मिनरल्स बाहेर पडतात. अशावेळी कैरी तुमचं शरीर थंड ठेवण्यास मदत करते.  कैरीचा ज्युस प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या  उद्भवत नाही. शरीरात सोडियम आणि इतर मिनरल्सची पातळी नियंत्रणात राहते.

३) पोटाच्या समस्या दूर होतात

 उन्हाळ्यात पचनसंबंधी समस्या उद्भवतात. यावर कैरी अत्यंत गुणकारी व फायदेशीर आहे. कैरीमुळे पाचकरसाची निर्मिती नीट होते आणि पचनप्रक्रिया सुरळीत पार पडते. मलावरोध, अपचन, एसिडीटी, हार्टबर्न, मळमळ अशा समस्या दूर होतात. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते, रक्तप्रवाह सुरळीत राहतो परिणामी हृदयासंबंधी आजार दूर राहतात.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Leave a Comment