ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

0

अहमदनगर Live24 टीम ,12 जुलै 2020 : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण परिसरात एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. उज्ज्वला भगवान शेळके (वय २४) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

ही घटना शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उघडकीस आली. कोपरगाव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्ज्वला हिने घरासमोरील पडवीच्या लोखंडी गजाला नायलॉनच्या ओढणीने गळफास घेतल्याचे आढळून आले.

Advertisement

उज्ज्वला हिने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपास कोपरगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक ए. एम. दारकुंडे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

Advertisement

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

Advertisement
li