अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ७० रुग्णांची भर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवार) सायंकाळपासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ७० ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या आता १३२७ इतकी झाली असून एकूण रुग्ण संख्या २८५८ इतकी झाली आहे.

आज ४४ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता १४८० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये संगमनेर तालुका १२, पारनेर तालुका ०५, नेवासा तालुका ०२, राहाता ११, राहुरी ०७,

कोपरगाव ०३, नगर ग्रामीण ०३, नगर शहर ११, पाथर्डी ०१, शेवगाव ०१, भिंगार १०, कर्जत ०२, अकोले तालुका ०१, नांदेड ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment