अहमदनगर ब्रेकिंग : आज वाढले इतके कोरोना रुग्ण, वाचा दुपारपर्यंतचे अपडेट्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,1 ऑगस्ट 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली.

दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप लाईन रोड ०१, गुलमोहर रोड ०१, कायनेटिक चौक ०१, कासारवाडी पंपिग स्टेशन ०१, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड ०१),

नेवासा १३ (तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपुर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०१), जामखेड ०२ ( शहर ०१, डोण गाव ०१) अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • बरे झालेली रुग्ण संख्या:३६३९
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: १२९०
  • मृत्यू: ६८
  • एकूण रूग्ण संख्या: ४९९७
      • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

Leave a Comment