गणेश मंडळांना `या` नियमांचे करावं लागणार पालन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2020 :  नगर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाने यावर्षी गणेशोत्सव सध्या पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या काळात मिरवणुका आणि मंडप उभारणीस परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव मंडपाविना होणार असून सार्वजनिक मंडळांची संख्याही घटणार आहे.

बाजारपेठेतील दुकाने सजावटीच्या साहित्यांनी सजली आहेत. सजावट साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग सुरू आहे. उद्यापासून गणेशोत्सवास सुरुवात होत आहे. यंदा अकरा दिवसांचा हा उत्सव असून गणरायाचे विसर्जन एक सप्टेंबरला होणार आहे.

गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक मंडळांना मूर्ती स्थापन करण्यासाठी परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच मंडप उभारता येणार नाही. आरतीसाठी पाच जणांनाच मर्यादा घालण्यात आली आहे.

गणेश मंडळांनी आरती, गणेश दर्शन सोशल मीडियावरून लाईव्ह करावे, जेणेकरून नागरिकांची गर्दी होणार नाही, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

सार्वजनिक मंडळांना फक्त चार फूट उंचीची व घरगुती उत्सवात दोन फूट उंचीची मूर्ती बसविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे. शिवाय स्थापना व विसर्जन मिरवणुकीस बंदी घालण्यात आलेली आहे. यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्या घटणार आहे.

दुसरीकडे मात्र घरोघरी गणेशोत्सव ची तयारी सुरू आहे. गणरायाला आकर्षक सजावट करण्यासाठीच्या विविध साहित्यांची दुकाने थाटली आहेत. गणरायाच्या मूर्तीचींही दुकाने ठिकठिकाणी थाटली आहेत.

प्रशासनाकडून मूर्तीच्या उंचीसाठी मर्यादा घालण्यात आल्याने बाजारपेठेत लहान मूर्ती विक्रीसाठी जास्त प्रमाणात आल्या आहेत. नगर शहरामध्ये मानाच्या गणेश मंडळासह अनेक सार्वजनिक मंडळाकडून गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते.

यंदा गणेशोत्सवावर करोनाचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, शहर उपअधीक्षक संदीप मिटके यांनी शहरातील मंडळ प्रमुखांची बैठक घेतली होती.

……………………………………………………………………..
जाहिरात : व्यवसायाची सुवर्णसंधी – येवले अमृततुल्य या नामांकित चहाची सद्यस्थितीत तयार असलेली फ्रेंचायसी देणे ( विक्री ) साठी उपलब्ध आहे .
पत्ता :- प्रेम धन चौक महेंद्र पेढे वाला च्या समोर अहमदनगर
पहा फोटोज व लोकेशन पुढील लिंकवर https://bit.ly/3ggsEbn
फ्रेंचायसी साठी संपर्क :- आदि एन्टरप्रायजेस 9730197997, 9764855522, 9975167374
……………………………………………………………………….

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

Leave a Comment